हिरानंदानी इस्टेट येथील मल:प्रक्रिया केंद्राचे महापालिका आयुक्त जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 04:18 PM2019-10-28T16:18:43+5:302019-10-28T16:19:18+5:30

अमृत अभियानातंर्गत भूयारी गटार टप्पा क्रमांक ४ अंतर्गत हिरानंदानी इस्टेट पातलीपाडा येथील ५९ दश लक्ष क्षमतेच्या मल:प्रक्रिया केंद्राचे उद्धाटन आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Municipal Commissioner Jaiswal Inaugurate Processing Center at Hiranandani Estate | हिरानंदानी इस्टेट येथील मल:प्रक्रिया केंद्राचे महापालिका आयुक्त जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन 

हिरानंदानी इस्टेट येथील मल:प्रक्रिया केंद्राचे महापालिका आयुक्त जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन 

Next

ठाणे - अमृत अभियानातंर्गत भूयारी गटार टप्पा क्रमांक ४ अंतर्गत हिरानंदानी इस्टेट पातलीपाडा येथील ५९ दश लक्ष क्षमतेच्या मल:प्रक्रिया केंद्राचे उद्धाटन आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या मल: प्रक्रिया केंद्रामुळे घोडबंदर रोड परिसरातील सुमारे १० लक्ष लोकसंख्येला लाभ होणार आहे.

शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाग समितीनिहाय छोटी छोटी मल:प्रक्रिया केंद्रे सुरू करून शहरतील मल:जलाचे प्रभावी नियोजन करता यावे यासाठी छोटी छोटी मल:प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज घोडबंदर रोड परिसरातील हिरानंदानी इस्टेट येथील ५९ दश लक्ष क्षमतेच्या मल:प्रक्रिया केंद्राचे आज उद्धाटन करण्यात आले.

या केंद्रामुळे मानपाडा, ब्रम्हांड, पातलीपाडा, बाघबीळ, आनंदनगर, ओवळा, माजिवडा, कासारवडवली, भायंदरपाडा या परिसरातील जवळपास १० लक्ष लोकसंख्येला फायदा होणार आहे. या वेळी उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उपनगर अभियंता भरत भिवापूरकर आदी उपस्थित होते.
 

Web Title: Municipal Commissioner Jaiswal Inaugurate Processing Center at Hiranandani Estate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.