महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उप सचिव म्हणून बदली

By सदानंद नाईक | Updated: January 8, 2025 20:36 IST2025-01-08T20:33:57+5:302025-01-08T20:36:31+5:30

उल्हासनगर : महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिव पदी नियुक्ती झाली. तर नवीन आयुक्ताच्या नियुक्ती ...

Municipal Commissioner Vikas Dhakane transferred to the post of Deputy Secretary to Deputy Chief Minister Ajit Pawar | महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उप सचिव म्हणून बदली

महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उप सचिव म्हणून बदली

उल्हासनगर : महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिव पदी नियुक्ती झाली. तर नवीन आयुक्ताच्या नियुक्ती बाबत शहरांत चर्चेला उधाण आले असून अंबरनाथ पालिकेचे प्रशासक डॉ प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची नावे समोर आली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

उल्हासनगर महापालिका आयुक्त पदी नियुक्त झालेल्या आयुक्तांनी सेवेचे ३ वर्ष पूर्ण केले. असे प्रकार क्वचित घडले आहे. आयुक्त विकास ढाकणे यांची गेल्या ऑगस्ट महिन्यात आयुक्त पदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी महापालिका प्रशासनावर फक्त ४ महिन्यात पकड निर्माण केली होती. 

तसेच खुल्या जागेत व रस्त्याच्या बाजूच्या हरितपट्टा तयार करणे, अवैध बांधकामे नियमित करणे, धोकादायक इमारतीचा प्रश्न शासनकडे लावून धरून आयुक्त व महापौर बंगल्याला प्राधान्य दिले. नवीन महापालिका इमारतीचा आराखडा मंजूर करून घेतला.

महापालिकेची स्वतःची पाणी पुरावठा योजना प्रस्तावासाठी पाठपुरावा केला. तसेच विविध विकास कामावर लक्ष केंद्रित केले होते. मात्र अचानक त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिव पदी नियुक्ती झाली. नवीन आयुक्त पदासाठी अंबरनाथ पालिकेचे प्रशासक डॉ प्रशांत रसाळ तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

Web Title: Municipal Commissioner Vikas Dhakane transferred to the post of Deputy Secretary to Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.