ठाणे शहरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 01:23 AM2021-09-06T01:23:30+5:302021-09-06T01:28:04+5:30

ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्यावतीने धडक कारवाईची मोहीम व्यापक प्रमाणात सुरुच आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. हातगाडया, आणि टपºया तसेच स्टॉल जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले.

Municipal Corporation cracks down on peddlers in Thane city | ठाणे शहरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई

हातगाडया आणि टपऱ्यांवर जेसीबीचा दणका

Next
ठळक मुद्दे हातगाडया आणि टपऱ्यांवर जेसीबीचा दणका

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्यावतीने धडक कारवाईची मोहीम व्यापक प्रमाणात सुरुच आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. हातगाडया, आणि टपºया तसेच स्टॉल जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले. ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या कारवाईतंर्गत नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमधील अलोक हाँटेल, गावदेवी, तीन हात नाका, राममारु ती रोड, तलावपाळी दुकानांसमोरील सामानांची उचलबांगडी करण्यात आली. त्याचबरोबर रस्त्यावरील फेरीवाले हटवून चार बॅग, पाच पुतळे चायनीजचा गाळा, दोन फळांच्या टोपल्या तर स्टेशन परिसर, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी नाका, कोर्ट नाका येथील ठेले सात कटलरी बॉक्स आणि नऊ फळांच्या पाट्या जप्त केल्या आहेत. तर माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील तुर्फे पाडा ब्रम्हांड, हिरानंदानी चौक ते श्रीमा शाळेच्या परिसरातील कारवाई दरम्यान 4 स्टॉल, तीन टपºया आणि दोन प्लास्टीक पेपर तसेच 5 बनर पोल तोडण्यात आले. हिरानंदानी इस्टेट येथील आर्केडिया शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकानबाहेर लावलेले चार लोखंडी स्टॉलसह इतरही दुकानाबाहेर लावलेल्या हातगाडी तसेच उसाच्या चरक्यासह हिरानंदानी रोडवरील भंगार आणि जनरेटर मशीन जप्त करण्यात आली.
दिवा प्रभाग समितीमध्येही दिवा स्टेशन रोड, दिवा आगासन रोड, दातिवली रोड, मुंब्रादेवी कॉलनी आणि शीळ फाटा रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच परपथावरील अतिक्रमणे हटविण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली. तसेच किरकोळ विक्र ेते यांच्यावर कारवाई करून त्यांचे सामान जप्त करण्यात आले. अतिक्र मण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, संतोष वझरकर, अलका खैरे आणि सागर साळुंखे आदींनी अतिक्र मण विभागाचे पथक आणि पोलिसांच्या मदतीने केली.

Web Title: Municipal Corporation cracks down on peddlers in Thane city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.