अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:45 AM2021-08-21T04:45:30+5:302021-08-21T04:45:30+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करून शुक्रवारी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील आणि कळवा प्रभाग ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करून शुक्रवारी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील आणि कळवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.
माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील वाघबीळ गाव येथे स्टील्ट अधिक पाच मजली अनधिकृत इमारतीवरील ढिगारा साफ करण्याचे काम सुरू आहे. भाईंदरपाडा येथील नाईट क्वीन (खुशी) या अनधिकृत लेडीज बारचे बांधकाम पूर्णपणे निष्कासित करण्यात आले. ओवळा येथील स्टर्लिंग या अनधिकृत लेडीज बारचे बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आले. तसेच ढोकाळी येथील डिमार्टच्या बाजूला चालू असलेले बैठे बांधकाम पूर्णपणे निष्कासित करण्यात आले. तर कळवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईंतर्गत कळवा प्रभाग समितीमधील लक्ष्मी अपार्टमेंटजवळ आझाद चौक खारेगाव येथे अमृत पार्कमध्ये तळ अधिक नऊ मजली अनधिकृत इमारतीमधील भिंती व दरवाजे निष्कासित करण्यात आले. कळवा मच्छी मार्केटजवळील राज वाईन्सच्या पाठीमागे ओम मयूरेश सोसायटीचे तळ अधिक आठ मजली अनधिकृत इमारतीच्या ११ रूमच्या अंतर्गत भिंती पाडण्यात आल्या. कळवा मार्केट ते स्टेशन रोड येथील रस्त्यावरच्या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली.
.........
वाचली.