मुलभुत सोयी-सुविधांसाठी महापालिकेकडे निधी नाही; मुख्यालयासमोर भीक मांगो आंदोलन
By अजित मांडके | Published: June 1, 2023 04:19 PM2023-06-01T16:19:19+5:302023-06-01T16:19:37+5:30
शहर हे स्मार्टसिटीच्या दिशेने जात असतांना शहराच्या मुलभुत सोयी-सुविधांसाठी महापालिकेकडे निधी नसल्याचे महापालिका सांगत आहे
ठाणे : महापालिका मुख्यालयासमोर दक्ष नागरीक संगम डोंगरे यांनी गुरुवारी भिक मागो आंदोलन केले. आम्हाला एक एक रुपयाचे महत्व समजत आहे. मात्र सुशोभिकरणाच्या नावाखाली कोट्यावधींचा निधी वाया घालविला आहे. परंतु मुलभुत सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्याअनुषगांने हे आंदोलन करण्यात आले.
शहर हे स्मार्टसिटीच्या दिशेने जात असतांना शहराच्या मुलभुत सोयी-सुविधांसाठी महापालिकेकडे निधी नसल्याचे महापालिका सांगत आहे. महापालिका रस्ते असतील, शहर सौंदर्यीकरणाच्या नावाखाली कोट्यावधींचा निधी खर्च केला जात आहे. परंतु उद्यानाची दुरावस्था झालेली असतांना त्यासाठी महापालिकेकडे निधी नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रभागातील इतर महत्वाच्या सोयी सुविधांसाठी देखील निधी नसल्याचेही महापालिका सांगत आहे. त्यामुळे मुलभुत सोयी सुविधांसाठी महापालिकेला निधी मिळावा यासाठी हे भीक मांगो आंदोलन करण्यात आल्याची माहिती डोंगरे यांनी दिली. हा निधी आता महापालिकेला दिला जाणार आहे. जेणेकरुन महापालिका या पैशातून तरी मुलभुत सोयी-सुविधांसाठी पैसे करतील अशी अपेक्षा आहे. मात्र तरी सुध्दा महापालिकेला जाग आली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.