मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने कंबर कसली

By admin | Published: June 19, 2017 03:48 AM2017-06-19T03:48:23+5:302017-06-19T03:48:23+5:30

शहरातील १०० टक्के मालमत्ता कर आकारणी करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. नवीन कर निर्धारणामुळे मालमत्तेच्या संख्येत ३० हजारांनी वाढ होणार

Municipal corporation has waited for real estate recovery | मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने कंबर कसली

मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने कंबर कसली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील १०० टक्के मालमत्ता कर आकारणी करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. नवीन कर निर्धारणामुळे मालमत्तेच्या संख्येत ३० हजारांनी वाढ होणार असून तब्बल २५ कोटीचे वाढीव उत्पन्न पालिकेला कायमस्वरूपी मिळणार आहे. सहा महिन्यात कर आकारण्याची ही प्रक्रीया पूर्ण होणार असल्याची माहिती विभागप्रमुख दादा पाटील यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेने गेल्या वर्षी १२० कोटीचे मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ठेवले होते. नोटबंदी काळात रेकॉर्डब्रेक ९० कोटी ९६ लाखाची वसुली झाली. त्यामुळे अर्धवट विकासकामे पूर्ण करण्यास मदत झाली. सहा महिन्यांपासून पालिकेचे एक पथक नव्या मालमत्तेचा शोध घेत आहेत. वर्षानुवर्षे हजारो मालमत्तेला कर आकारणी केलेली नाही. अशा ३० हजारापेक्षा जास्त मालमत्ता असून त्यांनी स्वत:हून कर आकारणीसाठी पुढे येण्याचे आवाहन विभागाने केले. अशा मालमत्तेच्या कर आकारणीतून तब्बल २५ कोटीचे उत्पन्न कायमस्वरूपी पालिकेला मिळणार आहे.
मुदतीत मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई केली. तसेच त्या मालमत्ता लिलावात काढल्या. मात्र लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही. पालिकेने पुन्हा नोटीस पाठवल्या आहेत.

Web Title: Municipal corporation has waited for real estate recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.