प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी महापालिकेने मागविली निविदा

By अजित मांडके | Published: January 19, 2024 03:18 PM2024-01-19T15:18:53+5:302024-01-19T15:19:19+5:30

बेतवडे येथील शासनाचे दोन भूखंड प्राप्त झाले आहेत, या भूखंडावर पी.पी.पी. या तत्वावर निविदा मागवून विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Municipal Corporation invited tender for affordable houses under Pradhan Mantri Awas Yojana | प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी महापालिकेने मागविली निविदा

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी महापालिकेने मागविली निविदा

ठाणे : प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 'परवडणारी घरे' ही योजना राबविण्यात येत असून ही योजना राबविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेस बेतवडे येथील शासनाचे दोन भूखंड प्राप्त झाले आहेत, या भूखंडावर पी.पी.पी. या तत्वावर निविदा मागवून विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार महापालिकेने आता निविदा मागिवली आहे. या पीपीपी तत्वानुसार महापालिकेने संबधीत ठेकेदाराला ३६.८५ कोटींचा विकसन खर्च हा महापालिकेस भरावा लागणार आहे.

बेतवडे येथे शासनाकडून प्राप्त झालेल्या दोन्ही भूखंडावर प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 'परवडणारी घरे' या शीर्षकाखाली आर्थिक दुर्बल घटकातंर्गत येणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रात सुमारे १४४१ लाभार्थी आहेत पैकी १२५३ लाभार्थ्यांना परवडणारी घरे अल्पदरात उपलब्ध होणार असून उर्वरित १८८ प्रकल्पबाधितांना रुपये दोन लक्ष इतका आर्थिक हिस्सा अदा करुन सदनिका उपलब्ध असणार आहे. या सदनिका ३० चौ.मी चटईक्षेत्र इतक्या मोजमापाच्या असतील. त्यानुसार आता या कामाची निविदा पी.पी.पी. तत्वावर काढण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले होते. त्यानुसार महापालिकेने आता या कामाची निविदा मागविली आहे.

निविदाकार १४४१ सदनिकांपेक्षा अधिक सदनिका (पाच वर्षाच्या देखभाल व दुरूस्तीसह) त्याचे स्वखचार्ने महापालिकेस बांधून देईल अशा विकासकासाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यामध्ये विकासकास उर्वरित चटईक्षेत्रामध्ये नियमानुसार सदनिका व गाळे तयार करुन व्यावसायिक विक्री करण्याची मुभा राहिल असाही निर्णय महापालिकेने घेतला आहे.
'परवडणारी घरे' या योजनेतंर्गत बांधण्यात येणाºया सदनिकांना केंद्रशासनामार्फत प्रति सदनिका रुपये दीड लाख तर राज्यशासनामार्फत रुपये १ लाख याप्रमाणे अनुदान प्राप्त होणार आहे.

तसेच या योजनेतील महत्वाची बाबी या योजनेत ३० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या १४४१ सदनिका विकासकाला बांधून द्याव्या लागणार आहेत. तसेच या प्रकल्पाकरीता येणारा विकसन खर्च ३६.८५ कोटी महापालिकेला डेव्हल्पमेंट चार्ज म्हणून द्यावे लागणार आहेत.

भुखंडनिहाय एकूण क्षेत्रफळाच्या १० टक्के क्षेत्रफळ हे ओपन स्पेसेस रोड्स, आरजी आदी करीता राखून ठेवून उर्वरीत ९० टक्के क्षेत्रफळापैकी सुमारे ४८.३० टक्के क्षेत्रफळावर ए.एच.पी. घरे, एम.आय.जी. घरे- व्यावसायिक गाळे, आरक्षित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

एकूण बांधण्यात येणाºया सदनिका पैकी ६.३१ टक्के सदनिका (१८८) या प्रकल्पातील बाधींतासाठी ४१.९९ टक्के सदनिका परवडणाºया घरांसाठी पात्र बाधितांसाठी व सेल कॅम्पोनेन्टमध्ये ५०.५० टक्के सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी व १.२१ टक्के व्यावसायिक गाळे (७८ वाणिज्य गाळे) उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

बेतव्े सर्व्हे क्र. ७८ साठी २.५ टक्के अधिक ६० टक्के अ‍ॅसिलरी व बेतवडे सर्व्हे क्र.१५/१ साठी २.२५ टक्के अधिक ६० टक्के अ‍ॅसिलरी या प्रमाणे चटई क्षेत्रफळाचा वापर करुन पार्कींगसह १६ व २२ मजल्याच्या आरसीसी पध्दतीच्या बहुमजली इमारती व अंतर्गत पायाभुत सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
परवडणाºया घरांची विक्री देखील प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार समाज विकास विभाग ठामपा यांच्याकडून डिमांड सर्व्हे करुन केले जाणार आहे.

Web Title: Municipal Corporation invited tender for affordable houses under Pradhan Mantri Awas Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.