पार्किंगसाठी महापालिकेने काढल्या निविदा, उल्हासनगरातील अवैध पार्किंगधारकांना नोटिसा
By सदानंद नाईक | Published: July 7, 2023 03:26 PM2023-07-07T15:26:06+5:302023-07-07T15:26:44+5:30
पार्किंगसाठी महापालिकेने काढल्या निविदा, उल्हासनगरातील अवैध पार्किंगधारकांना नोटिसा
उल्हासनगर : उल्हासनगर, शहाड व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन बाहेरील व शहरातील इतर ठिकाणच्या पार्किंगसाठी महापालिकेने निविदा काढल्या आहेत. तसेच त्याठिकाणी अवैधपणे पार्किंग वसुली करणाऱ्याना महापालिकेने नोटिसा काढल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. पार्किंग मधून नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याची संकेत आयुक्तांनी दिले.
उल्हासनगर महापालिकेच्या मुख्य उत्पन्नाच्या स्त्रोरातील मालमत्ता कर विभागाची वसुली गेल्या वर्षी निम्म्यावर आली. त्यामुळे महापालिकेने उत्पन्नाचे नवनवीन उत्पन्नाचे स्रोत सुरू करण्याचा धडाका सुरी केला. मोबाईल टॉवर्सवर भाडे आकाराने, पार्किंग सुरू करणे, जाहिरातिचे धोरण, फेरीवाल्यांवर स्वच्छता कर शुक्ल लावणे, व्यापाऱ्यांना परवाना शुल्क आदी नवीन उत्पन्न स्रोत सुरू केले. यातून महापालिकेला ४० कोटीच्या उत्पन्नाची शक्यता आहे. दरम्यान आयुक्त अजीज शेख यांच्या आयुक्त पदाच्या काळात नगररचनाकार विभागातील उत्पन्न १५ कोटीवरून ५० कोटींवर गेले आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागाच्या वसुलीचे टार्गेट १४० कोटी ठेवल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शहरात उल्हासनगर, शहाड व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन बाहेरील पार्किंगसह इतर पार्किंग जागा दुसरेच इसम वापरून, पार्किंगच्या नावाखाली हजारोची रक्कम वसुली करीत आहेत. याबाबतची माहिती आयुक्त अजीज शेख यांना मिळाल्यावर, त्यांनी अवैध पार्किंगधारकांना नोटिसा काढण्याचे आदेश देऊन पार्किंगसाठी निविदा काढल्या आहेत. पार्किंग बाबत निविदा काढल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तसेच शहर विकासासाठी पर्यायी उत्पन्नाचे स्रोत महापालिकेला निर्माण करावे लागणार आहे.