कर थकविणाऱ्या ८८२ मालमत्तांवर पालिकेची जप्तीची कारवाई, १५९ मालमत्ता केल्या सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 06:20 PM2018-12-07T18:20:36+5:302018-12-07T18:22:29+5:30

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून डिसेंबर महिन्यापासूनच थकीत मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार १५९ मालमत्ता सील करण्यात आल्या असून ९८ नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत.

Municipal corporation seizure action on 882 tax-exempted assets, 159 sealed property seals | कर थकविणाऱ्या ८८२ मालमत्तांवर पालिकेची जप्तीची कारवाई, १५९ मालमत्ता केल्या सील

कर थकविणाऱ्या ८८२ मालमत्तांवर पालिकेची जप्तीची कारवाई, १५९ मालमत्ता केल्या सील

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिकेने केल्या ९८ नळ जोडण्या खंडीतआॅनलाईनद्वारे सुध्दा कर भरणा करण्याची सुविधा

ठाणे - ठाणे महापालिकेच्यावतीने मालमत्ता कर व पाणी कर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली असून देयके न भरणाºयांविरुध्द धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतंर्गत ८८२ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करत १५९ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. तर ९८ नळ जोडण्या खंडीत करण्यांत आले आहेत. दरम्यान जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी आपली मालमत्ता कर आणि पाणी कराची थकबाकी रक्कम तत्काळ भरावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
                     ठाणे महापालिकेने २०१८-१९ या आर्थिक वर्षात ज्या मालमत्ताधारकांनी कराची रक्कम महापालिकेकडे जमा केलेली नाही, अशा मालमत्ताधारकांच्या मालमत्तेवर कडक कारवाई करण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार ठाणे महापलिकेच्या प्रभागनिहाय ही कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांना मालमत्ता कर जमा करणे सोईचे व्हावे या दृष्टीकोनातून १ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यत महापालिकेची सर्व मालमत्ता कर संकलन केंद्र सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (२१ मार्च, २०१९ वगळून) पुर्णवेळ तसेच सर्व रविवारी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत कार्यान्वीत राहणार आहेत. तसेच ज्या गृहसंकुलात, उद्योग संकुलात मालमत्ता कराची सदनिका, युनिटनिहाय स्वतंत्र बिले दिली जातात, अशा गृहसंकुल,उद्योग संकुलात मालमत्ता कर वसुलीचा कॅम्प संबंधितांच्या विनंतीनुसार आयोजित करण्यांत येईल. यासाठी प्रभाग कार्यालयाकडील मालमत्ता कर विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहनही पालिकेने केले आहे.
महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर आॅनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर वेळेत भरुन सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


 

Web Title: Municipal corporation seizure action on 882 tax-exempted assets, 159 sealed property seals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.