पालिका-विकासक वादात लोकांचे हाल

By Admin | Published: May 31, 2017 05:42 AM2017-05-31T05:42:14+5:302017-05-31T05:42:14+5:30

मीरारोेडच्या कनकिया पालिका कार्यालयापासून मंगलनगर नाक्यापर्यंतचा काँक्रीटचा रस्ता अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक त्रस्त

Municipal-development issues | पालिका-विकासक वादात लोकांचे हाल

पालिका-विकासक वादात लोकांचे हाल

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क
भार्इंदर : मीरारोेडच्या कनकिया पालिका कार्यालयापासून मंगलनगर नाक्यापर्यंतचा काँक्रीटचा रस्ता अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पालिका व विकासक यांच्यातील वादातून हा रस्ता रखडला असुन पावसाळ््यात तर लोकांचे आणखीन हाल होणार आहेत.
पालिकेने कनकिया व हाटकेश भागातील रस्ते हे टीडीआर (विकास हक्क हस्तांतरणा)च्या माध्यमातून काँक्रीटीकरणास घेतले आहेत. रस्ते काँक्रीटीकरणा करुन देण्याच्या बदल्यात पालिका रवी बिल्डरला टीडीआर देणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे काम पूर्ण होण्यापूर्वीच पालिकेने टीडीआर दिलेला आहे. रस्त्याच्या मोबदल्यात टीडीआर देणे चुकीचे असून विकासकाने रस्त्याची केलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी काँग्रेस गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक प्रमोद सामंत, शिवसेनेचे सुलतान पटेल आदींनी केल्या आहेत. या घोटाळ्याकरिता विकासकावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
रवी बिल्डर रस्त्यांची कामे वेळेत करत नसल्याबद्दल यापूर्वी देखील पालिकेने त्याला नोटिसा बजावल्या आहेत. कनकिया येथील पालिकेच्या नगररचना कार्यालयापासून मंगल नगरपर्यंतचा रस्ता काँक्रीटचा करण्यासाठी खोदून ठेवण्यात आला. गेल्या वर्षभरापासून हे काम रखडले आहे. एका मार्गीकेचे काँक्रीटीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु उर्वरीत काम बंद आहे.

Web Title: Municipal-development issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.