पालिका कर्मचारी - भंगार दुकानदारांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:42+5:302021-06-30T04:25:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : येथील भंगार गल्लीतील रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी गेलेले कर्मचारी व भंगार दुकानदारांत ...

Municipal employees - scuffle between scrap shopkeepers | पालिका कर्मचारी - भंगार दुकानदारांमध्ये हाणामारी

पालिका कर्मचारी - भंगार दुकानदारांमध्ये हाणामारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : येथील भंगार गल्लीतील रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी गेलेले कर्मचारी व भंगार दुकानदारांत सोमवारी हाणामारी झाली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन चौघांना अटक केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

कॅम्प नं. ३ येथील काजल पेट्रोलपंप परिसरातील भंगार गल्लीतील रस्त्यावर भंगार दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. शिंपी यांच्या पथकाने सोमवारी भंगार गल्लीत जाऊन अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दुकानदारांनी कारवाईला विरोध केल्यावर महापालिका कर्मचारी व भंगार दुकानदार एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यांच्यात शिवीगाळ व धक्काबुक्की झाली. त्यानंतर तुफान हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भंगार गल्लीतील कारवाईदरम्यान झालेल्या हाणामारी प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, चौघांना अटक केली आहे. नेहरू चौक, शहाड रेल्वे स्टेशन परिसर, कॅम्प नं. ४ व ५ परिसरातील मार्केट रस्ता, शिरू चौक, जपानी व गजानन कापड मार्केट परिसरात दुकानदार व फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे.

Web Title: Municipal employees - scuffle between scrap shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.