महापालिका कर्मचारी संघटनेचा कामबंदचा इशारा; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 11:32 PM2020-12-31T23:32:41+5:302020-12-31T23:32:52+5:30

उल्हासनगर मनपा : सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

Municipal Employees Union's strike warning | महापालिका कर्मचारी संघटनेचा कामबंदचा इशारा; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

महापालिका कर्मचारी संघटनेचा कामबंदचा इशारा; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

Next

उल्हासनगर : शासनाच्या आदेशानंतरही कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करत नसल्याच्या निषेधार्थ, भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी ७ जानेवारीपासून कामबंदचा इशारा दिला. महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग, मग पालिका कर्मचाऱ्यांना का नाही, असा प्रश्न साठे यांनी उपस्थित केला.

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना शासनाच्या आदेशान्वये सातवा वेतन लागू करण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली होती. डिसेंबर महिन्याचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी महापालिकेला केली. मात्र, डिसेंबर महिना संपत आल्यावरही पालिकेकडून काहीही हालचाल न झाल्याने, संतप्त झालेल्या साठे यांनी सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा दिला व तसे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले आहे. महापालिकेत शासन नियुक्ती अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग, तर महापालिका कर्मचारी वंचित, असे चालणार नसल्याचे सांगून त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

महापालिका आयुक्तांनी उत्पन्न वाढवून, कर्मचाऱ्यांवरील वेतनावर ३५ टक्केपेक्षा कमी खर्च करणे आदी अनेक सूचनाही कर्मचारी संघटनेने निवेदनाद्वारे केल्या आहेत. ७ जानेवारीपूर्वी सातवा वेतन आयोग लागू न केल्यास, कामबंद आंदोलन केले जाणार आहे. 
या प्रकाराला आयुक्तांसह महापालिका प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा राधाकृष्ण साठे यांनी दिला. साठे यांनी सोमवारी महापालिका प्रांगणात कर्मचारी व प्रतिनिधींसोबत चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत विचारविनिमय करणार असल्याचे सांगितले. अनेक कर्मचाऱ्यांनीही कामबंद आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे चित्र आहे.  रम्यान, उल्हासनगर पालिकेत भाेंगळ कारभार सुरु असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक विभागांचा कारभार हा कनिष्ठांवर साेपविल्याने गाेंधळ उडाला आहे. 

Web Title: Municipal Employees Union's strike warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.