महापालिका कर्मचारी संघटनेचा कामबंदचा इशारा, सातवा वेतन आयोग लागू करा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 04:51 PM2020-12-29T16:51:40+5:302020-12-29T16:51:50+5:30
महापालिकेत शासन नियुक्ती आलेल्या अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग तर महापालिका कर्मचारी वंचित. असे चालणार नसल्याचे सांगून, अधिकाऱ्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे
सदानंद नाईक
उल्हासनगर : शासनाच्या आदेशनंतरही कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करत नसल्याच्या निषेधार्थ भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी ७ जानेवारीपासून कामबंदचा इशारा दिला. महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग, मग पालिका कर्मचाऱ्यांना का नाही? असा प्रश्न साठे यांनी उपस्थित केला. उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना शासनाच्या आदेशानव्हे सातवा वेतन लागू करण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली होती. डिसेंबर महिन्याचे वेतन सातव्या वेतन आयोग नुसार देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी महापालिकेला केली. मात्र डिसेंबर महिना संपत आल्यावरही पालिकेकडून काहीएक हालचाल न झाल्याने, संतप्त झालेल्या साठे यांनी सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. तसे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले असून कर्मचाऱ्या मध्ये असंतोष निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
महापालिकेत शासन नियुक्ती आलेल्या अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग तर महापालिका कर्मचारी वंचित. असे चालणार नसल्याचे सांगून, अधिकाऱ्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. महापालिका आयुक्तांनी उत्पन्न वाढवून, कर्मचाऱ्यावरील वेतनावर ३५ टक्के पेक्षा कमी खर्च करणे. आदी अनेक सूचनाही कर्मचारी संघटनेने निवेदनाद्वारे केल्या आहे. ७ जानेवारी पूर्वी सातवा वेतन आयोग लागू न केल्यास, कामबंद आंदोलन केले जाणार आहे. याप्रकाराला आयुक्तसह महापालिका प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा राधाकृष्ण साठे यांनी दिला. साठे यांनी सोमवारी महापालिका प्रांगणात कर्मचारी व प्रतिनिधी सोबत चर्चा करून आंदोलनाची दिशा बाबत विचार विनिमय करणार असल्याचे सांगितले. अनेक कर्मचारी यांनीही कामबंद आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे चित्र आहे.
सातव्या वेतनासाठी पालिका कट्टीबद्द......उपमहापौर भालेराव
उल्हासनगर महापालिकेची आर्थिक व्यवस्था कोरोना काळात डबघाईला आली. मात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी महापालिका कटीबद्ध असून पालिकेकडे मात्र निधी अपुरा आहे. आयुक्त सुट्टीवरून आल्यानंतर सातव्या वेतन बाबत चर्चा करून कर्मचाऱ्यांना दिलासा देणार असल्याचे संकेत उपमहापौर यांनी दिलीआहे