मीरारोडमध्ये पालिकेची गॅरेज, अस्वच्छता करणारे व प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई 

By धीरज परब | Published: December 7, 2023 07:44 PM2023-12-07T19:44:12+5:302023-12-07T19:44:27+5:30

केवळ एक दिवसा पूर्ती कारवाई दिखावा नको असे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे . 

municipal garage in mira road action against littering and plastic users | मीरारोडमध्ये पालिकेची गॅरेज, अस्वच्छता करणारे व प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई 

मीरारोडमध्ये पालिकेची गॅरेज, अस्वच्छता करणारे व प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचे मीरारोड प्रभाग समिती ५ मधील पथकाने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणारे व प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यां विरुद्ध मोहीम राबवली होती . 

महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या आदेशा नुसार स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड सह  मुकादम व ठेका कर्मचारी यांच्या पथकाने मिळून नया नगर व शांती नगर परिसरात मोहीम राबवली . ह्या भागातील रस्त्यांवर चालणाऱ्या ६ गॅरेजवर प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे ३००० हजार इतका दंड आकाराला आहे.  सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या १६ गाड्यांवर कारवाई करत २४०० रुपये दंड वसूल केला गेला .  

विकासक व बंदी असलेले प्लस्टिक बाळगणारे अश्या १० जणांवर कारवाई करत प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दंड वसूल केला गेला . एकूण ५८ दुकाने व आस्थापना यांची तपासणी करून २२ हजार ५०० रुपये इतका दंड पथकाने वसूल केला आहे. तर महापालिकेने शहरात नियमितपणे अशी धडक कारवाई केल्यास परिणामकारक ठरेल . केवळ एक दिवसा पूर्ती कारवाई दिखावा नको असे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे . 

 

Web Title: municipal garage in mira road action against littering and plastic users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.