हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उल्हासनगरातील १०२ बांधकामे, ४५ फटाक्याच्या दुकानांना महापालिकेच्या नोटिसा

By सदानंद नाईक | Published: November 9, 2023 05:48 PM2023-11-09T17:48:40+5:302023-11-09T17:49:01+5:30

 उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेचे शहर असून हवेच्या प्रदूषणबाबत मुंबईला मागे टाकले.

Municipal notices to 102 constructions, 45 firecracker shops in Ulhasnagar to improve air quality | हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उल्हासनगरातील १०२ बांधकामे, ४५ फटाक्याच्या दुकानांना महापालिकेच्या नोटिसा

हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उल्हासनगरातील १०२ बांधकामे, ४५ फटाक्याच्या दुकानांना महापालिकेच्या नोटिसा

उल्हासनगर : शहरात वाढलेले प्रदूषण व हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेने एकून १०२ बांधकामे व ४५ फटाक्याच्या दुकानांना गुरवारी नोटिसा दिल्या आहेत. बांधकाम करतांना महापालिकेने घालून दिलेल्या नियम व अटी-शर्तीच भंग केल्यास कारवाईचे संकेत दिले आहे.

 उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेचे शहर असून हवेच्या प्रदूषणबाबत मुंबईला मागे टाकले. हवेची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी महापालिका पुढे सरसावली असून शहरात सुरू असलेल्या १०२ परवानाधारक बांधकामांना नगररचना विभागामार्फत नोटीसा बजाविल्या आहेत. बांधकामांमुळे होणारे हवेचे रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणेबाबत त्यांना सुचित केले आहे. बांधकामाच्या ठिकाणी कमीतकमी २५ फुटापर्यंत मेटल शीट उभारणे, इमारतीची बांधकामे सुरु असलेल्या ठिकाणी बांधकामे हिरव्या कपडयाने झाकुन घेणे, बांधकामांचे निष्कासन सुरु आहे. अशी बांधकामेदेखील हिरव्या कपडयाने झाकुन येणे, बांधकाम निष्कासनाची कार्यवाही सुरु असताना त्याठिकाणी सतत पाण्याची फवारणी करणे, बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम साहित्य उतरविणे व चढविताना पाण्याची फवारणी करणे, बांधकाम साहित्य ने-आण करणारी सर्व वाहने पुर्णपणे बंदीस्त असणे, बांधकामांच्या ठिकाणी होणारे ड्रिलींग, कटींग, ट्रीमींग चे काम बंदीस्त जागेत करणे तसेच सदर काम सुरु असताना त्याठिकाणी सतत पाण्याची फवारणी करणे, बांधकामाच्या ठिकाणी काम करणा-या सर्व कर्मचारी यांनी स्वरक्षणाकरीता मास्क, गांगल, हेल्मेट इत्यादीचा वापर करण्यास सुचविले आहेत. 

शहरातील नेहरू चौकासह विविध ठिकानी फटाक्याचे दुकाने सजले आहे. हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी रात्री ७ ते १० या कालावधीत फटाके वाजविले जातील. शासनाने जारी केलेल्या अधिसुचनेद्वारे म्हटलें आहे. १२५ डेसीबल पेक्षा जास्त आवाज करणारे फटाके वाजविले जाणार नाहीत. याबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे. शहरातील एकून ४५ फटाक्याच्या दुकानांना महापालिकेने नोटिसा देऊन, कारवाईचे संकेत दिले. आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, डॉ. सुभाष जाधव, मुख्य लेखा परिक्षक शरद देशमुख, सर्व सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी, सहा. सार्व. आरोगय अधिकारी व सर्व विभागप्रमुख घसरलेला हवेचे दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नशिल राहावे लहाणार आहेत

Web Title: Municipal notices to 102 constructions, 45 firecracker shops in Ulhasnagar to improve air quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.