महापौरांसह पालिका पदाधिकारी व नगरसेवकांनी केलं जमावबंदी व कोरोना नियमांचं उल्लंघन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 07:45 PM2021-06-27T19:45:32+5:302021-06-27T19:54:46+5:30

Mira Road News : भाईंदर पश्चिमेस मॅक्सस मॉल चौकीसमोर भाजपचे जिल्हाध्यक्ष रवि व्यास सह काही नगरसेवक व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते.

Municipal office bearers and corporators along with the mayor violated the curfew and corona rules | महापौरांसह पालिका पदाधिकारी व नगरसेवकांनी केलं जमावबंदी व कोरोना नियमांचं उल्लंघन 

महापौरांसह पालिका पदाधिकारी व नगरसेवकांनी केलं जमावबंदी व कोरोना नियमांचं उल्लंघन 

Next

मीरा रोड - जमावबंदीचा आदेश व कोरोना नियमांचे उल्लंघन खुद्द महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्यासह पालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांनी शनिवारी बेकायदेशीर रास्ता रोको करून केले असताना पोलिसांनी मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल न करताच व्हीआयपी वागणूक दिल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र संताप व्यक्त होत आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याप्रकरणी शनिवारी मीरा-भाईंदरच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे उपमहापौर हस्मुख गेहलोत, सभागृहनेता प्रशांत दळवी सह पालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक यांनी भाजपा कार्यकर्त्यांसह दहिसर चेक नाका येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी काही काळ रस्ता रोखून वाहतूक अडवून ठेवली. 

भाईंदर पश्चिमेस मॅक्सस मॉल चौकीसमोर भाजपचे जिल्हाध्यक्ष रवि व्यास सह काही नगरसेवक व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. नवघर नाका येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत सह काही नगरसेवक, कार्यकर्ते यांनी निदर्शने केली होती. आंदोलकांनी सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडवला तर अनेकांनी मास्क घातलेले नव्हते. 

सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता अडवणे सह जमावबंदी आदेशाचे तसेच कोरोना निर्देशांचे उल्लंघन केलेले असताना पोलिसांनी मात्र महापौरांसह पालिका पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांना खास सवलत दिली. या आंदोलकांना ताब्यात दिखाव्या पुरते ताब्यात घेऊन नंतर केवळ समज देऊन सोडून दिले गेले. 

एकीकडे कोरोनाचा डेल्टा व्हेरियंटमुळे चिंता वाढली असताना महापौरांसह ज्यांनी कायदे नियमांचे पालन करायचे तेच जर उल्लंघन करत असतील तर कारवाई फक्त सामान्य नागरिकांवरच का? असा सवाल सामान्य नागरिकांमधून होत आहे. नागरिकांनी  नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर दंड वसुली सह गुन्हा दाखल केला जातो. कोरोना रोखण्यासाठी नियमांचे पालन करा, मास्क घाला असे उद्देश हेच महापौर, उपमहापौर आदी लोक प्रतिनिधी, महापालिका व पोलिस प्रशासन शहरातील नागरिकांना सातत्याने देत असतात. 

शहराच्या प्रथम नागरिक महापौरांसह पालिका पदाधिकारी, नगरसेवक हेच राजरोसपणे कायदे नियमांचे उल्लंघन करून कोरोना संसर्ग पसरवण्या साठी असले प्रकार करत असताना त्यांना मात्र पोलिसांनी कोणताही दंड न करता व त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता मोकाट सोडणे म्हणजे सर्वसामान्य नागरिक आणि राजकारणी यांच्यात पोलीस भेदभाव करत असल्याचे हे आणखी एक ज्वलंत उदाहरण असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


 

Web Title: Municipal office bearers and corporators along with the mayor violated the curfew and corona rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.