भाईंदरच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील ८ कुटुंबियांना पालिकेचा निवारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 07:43 PM2021-06-01T19:43:10+5:302021-06-01T20:13:04+5:30

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या महेश नगर २ ह्या इमारतीतील ८ सदनिकाधारक कुटुंबियांना महापालिकेने एमआरडीएच्या भाडे तत्त्वावरील सदनिका राहण्यास दिल्या ...

Municipal shelter for 8 families in Bhayander's crashed building | भाईंदरच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील ८ कुटुंबियांना पालिकेचा निवारा 

भाईंदरच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील ८ कुटुंबियांना पालिकेचा निवारा 

Next

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या महेश नगर २ ह्या इमारतीतील ८ सदनिकाधारक कुटुंबियांना महापालिकेने एमआरडीएच्या भाडे तत्त्वावरील सदनिका राहण्यास दिल्या आहेत .   विशेष म्हणजे ३९ सदनिकां पैकी केवळ ८ जणच मालक होते तर बाकी सर्व भाडेकरू असल्याचे स्पष्ट झाले आहे . 

तौक्ते चक्रीवादळा दरम्यान मुसळधार पाऊस आणि वारा होता. १७ मे रोजी भाईंदर पश्चिम, शिवसेना गल्लीतील महेश नगर २ ह्या इमारतीच्या पहिल्या ते तिसऱ्या मजल्याची सामूहिक बाल्कनी कोसळून जिन्याचा मार्ग बंद झाला होता. सुमारे ४५ वर्ष जुनी इमारत असल्याने ती धोकादायक म्हणून पालिकेने पडून टाकली होती . 

परंतु ह्या धोकादायक इमारतीच्या ३९ पैकी केवळ ८ सदनिकां मध्येच मूळ मालक रहात होते . बाकी सर्व भाडेकरू होते . जेणे करून मूळ मालक असलेल्या ८ कुटुंबियांना खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन तसेच नगरसेवक एड . रवी व्यास यांच्या पाठपुराव्या मुळे दहिसर चेकनाका येथे असलेल्या दर्वेश या एम.एम.आर.डी.ए इमारतीतील सदनिकां मध्ये पर्यायी पुनर्वसन करण्यात आले आहे . पालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या दालनात खासदार राजन विचारे , आमदार गीता जैन , विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील , नगरसेवक रवी व्यास , राजू भोईर , गटनेत्या नीलम ढवण आदी उपस्थितांच्या हस्ते आपतग्रस्तांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या . 

 

Web Title: Municipal shelter for 8 families in Bhayander's crashed building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.