काय चाललंय काय? मीरा भाईंदरमध्ये लसीसाठी पालिकेचे टोकन नगरसेवक वाटतात स्वत:च्या कार्यालयातून!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 09:14 PM2021-09-09T21:14:54+5:302021-09-09T21:15:21+5:30

मीरा भाईंदर महानगरपालिकेची लस घेण्यासाठीची टोकन चक्क नगरसेवक स्वतःच्या कार्यालयात बसून वाटत असल्याचा व्हिडीओ व्हायरल

Municipal token for vaccination in Mira Bhayander from the office of the corporator | काय चाललंय काय? मीरा भाईंदरमध्ये लसीसाठी पालिकेचे टोकन नगरसेवक वाटतात स्वत:च्या कार्यालयातून!

काय चाललंय काय? मीरा भाईंदरमध्ये लसीसाठी पालिकेचे टोकन नगरसेवक वाटतात स्वत:च्या कार्यालयातून!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिकेची लस घेण्यासाठीची टोकन चक्क नगरसेवक स्वतःच्या कार्यालयात बसून वाटत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पालिका टोकन घोटाळ्याच्या आरोपांना बळ मिळाले आहे. गंभीर बाब म्हणजे सामान्य नागरिकांना लस घेण्यासाठी टोकन मोठ्या हाल अपेष्टा सहन करून मिळत असताना नगरसेवकांना पालिकेची टोकन मिळणे म्हणजे लस साठी टोकनची काळाबाजारी असून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेच्या लसीकरण मोहिमेत महापालिकेच्या संगनमताने काही नगरसेवक, राजकारणी हस्तक्षेप करत वशिलेबाजी चालवत असल्याचे गैरप्रकार या आधी देखील उघडकीस येऊन सुद्धा महापालिका प्रशासन मात्र कारवाई ऐवजी गैरप्रकारांना संरक्षण व प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. 

ह्यापूर्वीही पालिकेच्या बंदरवाडी आरोग्य केंद्रात भाजपचे नगरसेवक रोहिदास पाटील व त्यांच्या कुटुंबिय, निकटवर्तीयना  थेट डॉक्टरांच्या दालनातच लसीकरण प्रमुख डॉ अंजली पाटील यांच्या समक्षच व्हीआयपी सेवा देत लस दिल्या गेल्याचे प्रकरण लोकमतने उघडकीस आणले होते.  विनायक नगर लसीकरण केंद्रांवर सुद्धा प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश जाधव आणि डॉ अंजली पाटील यांच्या समक्ष एका नगरसेविकेच्या निकवर्तीय ने स्वतःचे टोकन वाटल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या शिवाय विविध ठिकाणी टोकन गैरप्रकार, वशिलेबाजीचे आरोप होत असताना पालिकेने अजूनही त्यावर कारवाई न करता गैरप्रकारांना पाठीशी घालण्याचा प्रकार चालवला असल्याची टीका होत आहे.
 
त्यातच बुधवारी ८ सप्टेंबर रोजी महापालिकेने ३७ केंद्रांवर जंबो लसीकरण मोहीम ऑफलाईन पद्धतीने आयोजित केली होती.  त्यासाठी लसीकरण केंद्रांवर लोकांनी दिवस रात्र रांगेत उभे राहून टोकन घेतले व नंतर लस घेतली. तसे असताना महापालिकेत सत्ताधारी भाजपचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील मात्र लसीकरण केंद्रांवर दिली जाणारी टोकन स्वतःच्या खाजगी कार्यालयात बसून देत असल्याचा धक्कादायक प्रकार एक व्हायरल व्हिडीओ नेउघडकीस आला आहे. 

त्या व्हिडिओत एका व्यक्तीस पालिकेचे टोकन दिले व टेंबा येथे लसीकरण केंद्रांवर जाण्यास स्वतः पाटील यांनी सांगितले. एकीकडे सर्व सामान्य नागरिक लस आणि टोकन साठी दिवस - रात्र पाऊस पाण्यात तहान - भुकेची पर्वा न करता रांगेत हाल सहन करत तासन तास उभे राहतात. अनेक नगरसेवक, राजकारणी सुद्धा लसीच्या नियोजन साठी खटपट करत असतात. पण येथे मात्र नगरसेवक पाटील हे त्यांच्या खाजगी कार्यालयात बसून लस साठी टोकन देत असल्याने खळबळ उडाली आहे. पाटील यांच्या कडे टोकन आली कशी ? आणखी काही नगरसेवकांना सुद्धा अशी टोकन देण्यात आली आहे का ? असे प्रश्न काही नगरसेवकांसह राजकारणी यांना सुद्धा पडू लागले आहेत.

नागरिकांना टोकन व लस मिळणे अतिशय त्रासदायक होत असताना नगरसेवक मात्र पालिका टोकन चा काळाबाजार करत असल्याचा संताप  व्यक्त होत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. डॉ. प्रकाश जाधव म्हणाले की, व्हिडीओ निदर्शनास आला असून चौकशी केली जाईल असे सांगितले. महापालिका प्रशासन लाचार बनले असून त्यांची नगरसेवक वा राजकारण्यांवर कारवाईची हिम्मत नाही. पालिका फक्त सामान्य लोकांवरच कारवाईचा बडगा उगारून मर्दुमकी दाखवते अशी बोचरी टीका माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी केली आहे.

Web Title: Municipal token for vaccination in Mira Bhayander from the office of the corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.