उल्हासनगरात महापालिकेची परिवहन बस सेवा पावसाळ्यापूर्वी होणार सुरू

By सदानंद नाईक | Published: February 25, 2023 06:32 PM2023-02-25T18:32:24+5:302023-02-25T18:32:34+5:30

सर्वच बसेस इलेक्ट्रिकल, ३० कोटींची तरतूद

Municipal transport bus service will start in Ulhasnagar before monsoon | उल्हासनगरात महापालिकेची परिवहन बस सेवा पावसाळ्यापूर्वी होणार सुरू

उल्हासनगरात महापालिकेची परिवहन बस सेवा पावसाळ्यापूर्वी होणार सुरू

googlenewsNext

सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिका परिवहन बस सेवा पावसाळ्यापूर्वी सुरू होणार असल्याचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले. सर्व बसेस इलेक्ट्रिकल असल्याने प्रदूषणास आळा बसणार असून सर्वात कमी किंमतीच्या निविदा पिनॉकल कंपनीच्या असल्याने, त्या कंपनीला ठेका मिळण्याची शक्यता आहे.

उल्हासनगर महापालिकेने खाजगी ठेकेदारा मार्फत सुरू केलेली परिवहन बस सेवा तिकीट दरवाढीच्या वादातून काहीं वर्षांपूर्वी ठप्प पडल्याने, नागरिकांची गैरसोय होत आहे. परिवहन बस सेवा बंद असतांना दुसरीकडे परिवहन समितीवर महापालिका लाखो रुपयांची उधळपट्टी महापालिका करीत असल्याचा आरोप होत होता. तत्कालीन आयुक्त डॉ राजा दयानिधीं व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी महापालिका परिवहन बस सेवा पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली. शहरातील प्रदूषण बघता महापालिकेने इलेक्ट्रिकल बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आयुक्त पदी अजीज शेख यांची नियुक्ती झाल्यावर, खऱ्या अर्थाने परिवहन बस सेवेच्या प्रक्रियेला गती आली. ३० कोटीच्या निधीतून महापालिकेने १० एसी मिनीबस व ५२ सीटच्या १० बसेस खरेदी करण्यासाठी निविदा काढली. निविदेला ३ कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून पिनॉकल कंपनीच्या निविदा सर्वाधिक कमी किंमतीच्या आल्या आहेत.

महापालिका परिवहन बस सेवा सुरू करण्यापूर्वी आयुक्तांना परिवहन विभागाची स्थापना करावी लागणार आहे. त्यासाठी बस डेपो नियंत्रक, मॅनेजर, वाहक, तिकीट तपासनीस यासह एकून ९० पदे भरण्यासाठी शासनाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. शहाड फाटक येथील १ एकरच्या जागेत बस डेपो उभारण्यात येणार असून गेल्या आठवड्यात आयुक्त अजीज शेख यांनी अधिकाऱ्यांसह बस डेपोच्या जागेची पाहणी केली. बसेसच्या चार्जरसाठी इलेक्ट्रिकल चार्जर पॉईंट उभारावे लागणार आहे. तर एक इलेक्ट्रिकल चार्जर पॉईंट महापालिका मुख्यालय पाठीमागे महापालिकेने बनविले आहे. एकून २० बसेस पैकी १० एसी मिनीबस शहर अंतर्गत सेवेसाठी वापरण्यात येणार असून ५२ सीटच्या १० बसेस कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मुंबई आदी ठिकाणी सेवा देणार आहेत.

बस डेपोच्या कामाला लवकरच गती

शहाड फाटक येथे एका गृहनिर्माण प्रकल्पातील १ एकर जागा महापालिकेला मिळाली असून त्याठिकाणी महापालिका परिवहन बस डेपो बांधण्यात येणार आहे. आयुक्तांनी डेपोच्या जागेची पाहणी केल्यावर, डेपोच्या बांधणीला लवकरच सुरू करण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले आहे.

Web Title: Municipal transport bus service will start in Ulhasnagar before monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.