कचऱ्याचे विकेंद्रीकरण करणार पालिका, ओल्या कचऱ्यावर होणार प्रक्रिया

By अजित मांडके | Published: October 21, 2023 03:16 PM2023-10-21T15:16:41+5:302023-10-21T15:16:49+5:30

कोलशेतमध्ये ३० मेट्रीक टनाचा प्रकल्प

Municipalities will decentralize waste, process will be done on wet waste | कचऱ्याचे विकेंद्रीकरण करणार पालिका, ओल्या कचऱ्यावर होणार प्रक्रिया

कचऱ्याचे विकेंद्रीकरण करणार पालिका, ओल्या कचऱ्यावर होणार प्रक्रिया

ठाणे : ठाणे महापालिका आता डायघर प्रकल्प १०० टक्के क्षमतेने सुरु करीत आहेत. त्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे. दुसरीकडे सोसायटीवाल्यांनाही त्यांचा कचरा वर्गीकरणासाठी नोटीस बजावली जाणार आहे. यापुढे जाऊन आता ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी डिसेंट्रालाईजा प्रकल्प हाती घेत आहे. काही ठिकाणी ही प्रक्रियेची योजना सुरु आहे. तर नव्याने कोलशेत आणि ओवळा माजिवडा पट्यात आणखी क्षमतेने हे प्रकल्प राबिवली जाणार आहेत. त्यामुळे ओल्या कचºयाचा भार आणखी कमी करण्याचा प्रयत्न पालिकेचा आहे.

ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला १ हजार मेट्रीक टन कचºयाची निर्मिती होत आहे. त्यात ६० टक्के कचरा हा ओला आणि ४० टक्के कचरा हा सुका असल्याचे दिसत आहे. त्यातही ओल्या कचºयाची समस्या अधिक असल्याने त्यासाठी महापालिका विविध प्रयोग हाती घेत आहे. त्यात महापालिकेने मागील काही वर्षात कचऱ्याचे विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी ५ ते १० मेट्रीक टनाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. ते सुरु असून त्याठिकाणी ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्तपध्दतीने प्रक्रिया देखील केली जात आहे.

त्यानंतर आता महापालिका घनकचरा विभागाच्या माध्यमातून कोलशेत या भागात ३० मेट्रीक टनचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी जागा निश्चित झाली असून एका महिन्यात त्याठिकाणी प्रकल्प सुरु केला जाईल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. ओवळा माजिवडा भागात ५५ मेट्रीक कचºयावर प्रक्रिया सुरु आहे. तसेच आता नव्याने १०० मेट्रीक टनावर कचºयावर प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली. ऋुतु पार्क येथे १०, कौसा १० आणि हिरानंदानी भागातही ३५ मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. एकूणच त्या भागातील कचरा त्याच भागात प्रक्रिया केला जाणार आहे. त्यामुळे निश्चितच ओल्या कचºयाची असलेली समस्या भविष्यात कमी होण्यास मदत होणार असल्याचे यावरुन दिसत आहे.

Web Title: Municipalities will decentralize waste, process will be done on wet waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.