चेस द व्हायरस मोहिमेंतर्गत मीरा-भाईंदरमध्ये पालिकेने 3 दिवसांत केले 5 लाख लोकांचे सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 01:50 PM2020-07-17T13:50:28+5:302020-07-17T13:51:02+5:30

प्रत्येक पथकास रोज किमान दीडशे घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्याचे लक्ष्य दिले गेले आहे . प्रत्येकाची ऑक्सिमीटर व थर्मलमीटर ने तपासणी करणे पथकांना बंधनकारक केले आहे . 

The municipality conducted a survey of 5 lakh people in 3 days in Mira Bhayander under the Chase the Virus campaign | चेस द व्हायरस मोहिमेंतर्गत मीरा-भाईंदरमध्ये पालिकेने 3 दिवसांत केले 5 लाख लोकांचे सर्वेक्षण

चेस द व्हायरस मोहिमेंतर्गत मीरा-भाईंदरमध्ये पालिकेने 3 दिवसांत केले 5 लाख लोकांचे सर्वेक्षण

googlenewsNext

मीरारोड - मुंबई महापालिकेच्या धर्तीवर मीरा भाईंदर महापालिकेने देखील कोरोनाला मत देण्यासाठी चेस द व्हायरस मोहीम राबवली असून गेल्या तीन दिवसात शहरातील 5 लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे . 

मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता झटपट कोरोना चाचणीचा अहवाल यावा यासाठी अँटीजन किट ने चाचणी करा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी चालवली होती . शासना कडून देखील 4 हजार अँटीजन टेस्ट किट महापालिका देण्यात आल्या आहेत . पालिकेने 10 हजार किट खरेदी केल्या असून येत्या काही दिवसात आणखी 1 लाख किट खरेदी करणार आहे . सदर प्रत्येक किटची किंमत 450 रुपये अधिक जीएसटी इतकी आहे . 

शहरातील कोरोनाची लागण झालेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी व त्यांना अलगीकरण करण्यासाठी या टेस्टचा मोठा उपयोग होणार असल्याचे सांगितले जात आहे . महापालिकेने देखील या झटपट करून चाचणी करून घेण्यासाठी कंबर कसली आणि मुंबई महापालिकेच्या धर्तीवर चेस द व्हायरस हि विशेष सर्वेक्षण मोहीम आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी मंगळवार 14 जुलै पासून सुरु केले . . 

पालिकेने या विशेष सर्वेक्षणासाठी 10 आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण 417 तपासणी पथके तैनात केली आहेत . प्रत्येक पथकात दोन असे एकूण 834 कर्मचारी नेमलेले आहेत . त्यासाठी आशा वर्कर , पालिका कर्मचारी, शिक्षक , बालवाडी आणि अंगणवाडी शिक्षिका, स्वयंसेवक यांना प्रशिक्षण दिले गेले आहे . 

प्रत्येक पथकास रोज किमान दीडशे घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्याचे लक्ष्य दिले गेले आहे . प्रत्येकाची ऑक्सिमीटर व थर्मलमीटर ने तपासणी करणे पथकांना बंधनकारक केले आहे . तसेच ऑक्सिजन लेव्हल कमी असणारे , श्वास घेणास त्रास , खोकला , ताप आदी कोरोनाशी संबंधित लक्षणे दिसल्यास नोंद केली जात आहे . 

मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसातच 1 लाख 66 हजार 708 घरं , निवास आदी ठिकाणांना या पथकांनी भेटी दिल्या आहेत . यातून 4 लाख 99 हजार 133 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे . मंगळवारी 169 तर गुरुवारी 82 ताप आदी लक्षणे असलेले संशयित रुग्ण सर्वेक्षणात आढळून आले . लक्षणे आढळलेल्यांची माहिती स्थानिक आरोग्य केंद्रास देण्यात येत आहे . अश्या संशयितांची अँटीजन किट मार्फत झटपट तपासणी केली जाणार आहे . 

हे सर्वेक्षण 18 जुलै पर्यंत चालणार आहे असे वैद्यकीय विभागातील सूत्रांनी सांगितले . नागरिकांनी पालिकेच्या या सर्वेक्षणास सहकार्य करून आवश्यकती सर्व माहिती देण्याचे आवाहन महापौर ज्योत्सना हसनाळे व आयुक्त डॉ . राठोड यांनी केले आहे . 

Web Title: The municipality conducted a survey of 5 lakh people in 3 days in Mira Bhayander under the Chase the Virus campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.