भिवंडीत बनावट तूप बनविण्याचा कारखाना पालिकेने केला उध्वस्त,मोठ्या प्रमाणावर बनावट तूप व साहित्य जप्त

By नितीन पंडित | Published: January 2, 2024 05:26 PM2024-01-02T17:26:20+5:302024-01-02T17:26:58+5:30

भिवंडीत आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा मारून तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे तूप बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे.

municipality destroyed the fake ghee factory in bhiwandi confiscated a large amount of fake ghee and materials | भिवंडीत बनावट तूप बनविण्याचा कारखाना पालिकेने केला उध्वस्त,मोठ्या प्रमाणावर बनावट तूप व साहित्य जप्त

भिवंडीत बनावट तूप बनविण्याचा कारखाना पालिकेने केला उध्वस्त,मोठ्या प्रमाणावर बनावट तूप व साहित्य जप्त

नितीन पंडित, भिवंडी : शहरातील खाडीलगतच्या ठिकाणी असलेल्या इदगाह साल्टर हाऊस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर म्हशी व रेड कापल्यानंतर त्यांचे अवशेष आणून त्यामधील चरबी वितळवून त्यापासून बनावट तूप बनवून ते शहरातील छोट्या मोठ्या खानावळी, हॉटेल व्यवसायीक यांना विक्री करीत असल्या बाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी मंगळवारी पालिका आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा मारून तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे तूप बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे.

शहरातील इदगाह साल्टर हाऊस येथे बंद असलेल्या कत्तलखान्यात शहरातील खाण्यासाठी कापण्यात आलेल्या म्हशी रेड्यांचे अपशिष्ट इदगाह साल्टर हाऊस येथे टाकण्यात येतात.तेथे या अपशिष्टा मधून चरबी वेगळी काढून सुकवून त्यापासून तूप बनविण्याचे काम या भागात बिनदिक्कत सुरू होते.हे तूप भेसळ करून अनेक खानावळ छोटी हॉटेल व तळलेले पदार्थ विक्री करणाऱ्यांना विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.याची गांभीर्याने दखल घेत आयुक्त अजय वैद्य यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर पालिका पर्यावरण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव,आपत्कालीन विभाग प्रमुख साकिब खर्बे,कर मूल्यांकन विभागाच्या कार्यालयीन अधीक्षक सायरा बानो यांनी पालिका पथकासह या ठिकाणी कारवाई करीत तेथे तूप कढविण्याच्या भट्टी सुरू असल्याचे आढळून आले.त्यावेळी कर्मचाऱ्यांनी तूप कढविण्याच्या भट्टी वरील कढई मधील साहित्य फेकून देत,बनावट तुपाचे १५ किलो वजनाचे २० डब्बे,कढई असे मोठे साहित्य जप्त केले आहे.या बाबत पालिका प्रशासना कडून स्थानिक भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुदाम जाधव यांनी दिली आहे.

Web Title: municipality destroyed the fake ghee factory in bhiwandi confiscated a large amount of fake ghee and materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.