निधीसाठी पालिका पुढे सरसावल्या

By Admin | Published: February 2, 2016 04:01 AM2016-02-02T04:01:15+5:302016-02-02T04:01:15+5:30

अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या ९६व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनासाठी लागणाऱ्या निधीची जमवाजमव करण्यास सुरुवात झाली आहे

The municipality has gone ahead for the fund | निधीसाठी पालिका पुढे सरसावल्या

निधीसाठी पालिका पुढे सरसावल्या

googlenewsNext

प्रज्ञा म्हात्रे ,  ठाणे
अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या ९६व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनासाठी लागणाऱ्या निधीची जमवाजमव करण्यास सुरुवात झाली आहे. संमेलनाचा खर्च २ कोटी अपेक्षित असून, महापालिकांबरोबर दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेबरोबर कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई महापालिकेने निधीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
ठाणे शहरात होणाऱ्या नाट्यसंमेलनासाठी २ कोटींच्या घरात खर्च अपेक्षित असल्याने आयोजक निधीच्या प्रतीक्षेत आहेत. हे नाट्यसंमेलन हा ठाणे जिल्ह्यातील उपक्रम आहे. याचा मला सार्थ आनंद आहे. म्हणूनच ११ लाखांचा निधी देण्यात येणार असून, त्यासंदर्भात ठराव पास केला आहे. येत्या दोन दिवसांत हा निधी दिला जाणार असल्याचे कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सांगितले. नाट्यसंमेलनाला निधी देण्यासंदर्भात महापालिकेचा ठराव झाला आहे. ५० लाख रुपये निधी देण्याचा आमचा मानस असला तरी प्रशासन किती निधी द्यायचा, हा निर्णय घेईल, असे ठाणे शहराचे महापौर संजय मोरे यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिका नाट्यसंमेलनाला निश्चितच निधी देणार आहे. यासंदर्भात महासभेत प्रस्ताव येणार असून, यासाठी १० लाख रुपये प्रस्तावित केले आहेत. सभागृहात यावर चर्चा केली जाणार असून नेमकी किती रक्कम द्यायची, हे ठरवले जाणार आहे. प्रशासनासोबत चर्चा करून निधी देण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे मीरा-भार्इंदरच्या महापौर गीता जैन यांनी सांगितले. महापौरांशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे वसई-विरार महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले.

Web Title: The municipality has gone ahead for the fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.