कामावर उशिराने येणाऱ्या ३४ कर्मचाऱ्यांना बजावल्या पालिकेने नोटीस
By अजित घस्ते | Published: October 20, 2022 04:18 PM2022-10-20T16:18:23+5:302022-10-20T16:18:42+5:30
ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. परंतु प्रभाग समिती असेल, आरोग्य विभाग असेल किंवा महापालिका मुख्यालय असेल अशा प्रत्येक ठिकाणी कर्मचारी, अधिकारी हे उशीरानेच येतांना दिसत आहेत.
ठाणे : कामाच्या ठिकाणी उशिरा येणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने पावले उचलली असून त्यानुसार आतार्पयत तब्बल ३४ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये एका कार्यालयीन अधिक्षकाचा समावेश आहे. केवळ महापालिका मुख्यालयातच नाही तर महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्तांमार्फत रोजच्या रोज हजेरी मस्टर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. परंतु प्रभाग समिती असेल, आरोग्य विभाग असेल किंवा महापालिका मुख्यालय असेल अशा प्रत्येक ठिकाणी कर्मचारी, अधिकारी हे उशीरानेच येतांना दिसत आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल त्याने वेळेतच असा नियम आहे. मात्र हा नियम पाळला जात नसल्याचे दिसून आले आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या संदर्भात आस्थापना विभागाने निर्देश दिले असून त्यानुसार अशा कर्मचा:यांना शिस्त लावण्यासाठी पावले उचलावीत असे सांगितले गेले आहे. त्यानुसार आता महापालिकेच्या आस्थापना विभागाकडून या संदर्भात पावले उचलण्यात आली आहेत.
कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी आणि कामावर वेळेत येण्यासाठी महापालिकेमार्फत सध्या मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर्मचा:यांच्या विरोधात मागील आठवडय़ापासून पालिकेने मस्टरच गायब करुन उशिराने येणा:या कर्मचा:यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या दिवशी 3क् टक्के कर्मचारी हे कामाच्या ठिकाणी उशिराने आल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर आजही ही मोहीम सुरु असून आतार्पयत उशिराने येणा:या कर्मचा:यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र वारंवार सांगूनही कामात सुधारणा होत नसल्याने, अशा ३४ कर्मचा:यांना पालिकेने नोटीस बजावल्या असून कामाच्या ठिकाणी उशीर का होतो असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. यामध्ये एका कार्यलयीन अधिक्षकाचा समावेश आहे. त्यातही ज्यांना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत, ते सलग तीन दिवस कामाच्या ठिकाणी गैरहजर राहिले असल्याचे दिसून आले आहे.
महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये देखील अशा स्वरुपाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार सहाय्यक आयुक्त १० वाजता मस्टर जमा करीत असून उशिराने येणा:या कर्मचा:यांपुढे रिमार्क लावत असल्याचे दिसून आले आहे.