महापालिकेचे दोन दिवसांत शपथपत्र; अजून हवीय मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:32 AM2020-01-02T00:32:56+5:302020-01-02T00:33:16+5:30
केलेल्या प्रयत्नांचा लेखाजोखा मांडणार
ठाणे : न्यायालयाच्या निर्देशानुसार नव्या बांधकामांवर आलेली बंदी उठविण्यासाठी आता पालिकेला जाग आली आहे. त्यानुसार, पुढील दोन दिवसांत कचऱ्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाटीसाठी पालिकेने कायकाय प्रयत्न केले आहेत, याचे शपथपत्र न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.
कचरा विल्हेवाटीसाठी न्यायालयाने दोन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. परंतु, त्यानंतरही महापालिकेला न्यायालयात आपली बाजू मांडण्यात अपयश आले आहे. असे असताना आता महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जुना आणि नवीन निर्माण होणारा कचरा याची विल्हेवाट लावण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, जुन्या कचºयाची विल्हेवाट लावण्यासंदर्भातील प्रस्ताव डिसेंबरमध्ये झालेल्या महासभेत मंजूर केला असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया आता सुरू केली जाणार आहे. तसेच शहरात निर्माण होणाºया कचºयावर विकेंद्रित आणि केंद्रित पद्धतीने विल्हेवाटीसाठी कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरूआहेत. त्यानुसार, डायघर येथील प्रकल्प या नव्या वर्षात सुरू होईल, अशी आशा पालिकेला आहे. याठिकाणी कचºयापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे.
या विजेचा वापर आजूबाजूच्या गावांना कसा करता येईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याठिकाणी प्रकल्पासाठी आवश्यक असलेला रस्ता तयार झाला असून, संरक्षक भिंतही बांधली आहे. परंतु, या प्रकल्पाच्या ठिकाणावरून जाणाºया उच्चदाब वाहिनीचा अडथळा येत असून तो हटविण्यासाठी २५ कोटींच्या खर्चाचा प्रस्तावही मंजूर झाला आहे. आता महावितरणला ते काम करायचे आहे. याशिवाय, मशिनरीची आॅर्डरही दिली आहे.
विकेंद्रित पद्धतीनुसार हिरानंदांनी इस्टेट येथे ३५ मेट्रिक टन, वृंदावन येथे १० मेट्रिक टन आणि कोलशेत येथे ३५ मेट्रिक टन कचºयाचा विल्हेवाट लावण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर सुरूआहे. अशा पद्धतीने केंद्रित आणि विकेंद्रित पद्धतीने कचरा विल्हेवाटीचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. सुक्या कचºयाचीही विल्हेवाट लावण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून सुरू आहे.
तोडगा निघेल - जोशी
पालिकेच्या प्रयत्नांना कालावधी हा लागणार आहेच. ते काम एका दिवसात होणारे नाही, त्या अनुषंगाने शपथपत्र तयार केले असून ते दोन दिवसांत न्यायालयासमोर सादर करूआणि यावर तोडगा निघेल, अशी आशा उपायुक्त मनीष जोशी यांनी व्यक्त केली.