मुरबाड न.पंचायतीत भाजप विजयी
By admin | Published: November 3, 2015 01:15 AM2015-11-03T01:15:51+5:302015-11-03T01:15:51+5:30
मुरबाड नगरपंचायतीच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाजपा ने ११ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. सोमवारी लागलेल्या निकालानंतर मुरबाड मधे शिवसेना
मुरबाड/सरळगांव : मुरबाड नगरपंचायतीच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाजपा ने ११ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. सोमवारी लागलेल्या निकालानंतर मुरबाड मधे शिवसेना, राष्ट्रवदीचे पुन्हा एकदा पानीपत झाले आहे.
शिवसेनेला ३ कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्षांना प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. भाजपाने पुन्हा एकदा मुरबाड शहरावर सत्ता काबीज केल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. .
मुरबाड नगरपंचायती च्या निवडणुकीत भाजपचे खासदार कपील पाटील व आमदार किसन कथोरे यांचा प्रचाराला यश मिळाले आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार गोटीराम पवार व नुकतेच शिवसेनेत गेलेले अर्जुन शेळके यांची ताकद पाहता नेमका कोणता पक्ष सत्तेत येईल हे सांगता येणे कठीण होते. सुरु वातीच्या काळात शिवसेनेला पूर्ण बहुमताने मिळेल असा अंदाज होता. मात्र भाजपचे खासदार व आमदार यांनी प्रचारात घेतलेली आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले.
भाजपाची खेळी यशस्वी
एकेकाळचे राष्ट्रवादीचे दबंग नेते व आमदार किसन कथोरे यांना भाजपात प्रवेश देण्याची व भाजपाला मजबुती प्राप्त करून देण्याची भाजपाची खेळी या निकालामुळे यशस्वी ठरली आहे.
एकेकाळी गोटीराम पवारांच्या रुपाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला कथोरे यांनी भाजपाचा आमदार अनेक वर्षांनी प्राप्त करून दिला. त्यापाठोपाठ आता या नगरपंचायतीतही भाजपाला सत्ता मिळवून दिली आहे. बदलापूर पालिकेत झालेल्या पराभवाचे थोडे फार उट्टे त्यांनी या विजयाच्या रुपाने काढले आहे.