एकाच रात्रीत सात जबरी चोऱ्या करीत सुरक्षा रक्षकावर खूनी हल्ला: दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 09:49 PM2021-01-21T21:49:56+5:302021-01-21T21:53:53+5:30

एकाच रात्रीत सात जबरी चोºया करीत सुरक्षा रक्षकावरही चाकूचे वार करुन त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणाºया दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुलांना चितळसर पोसिलांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले.

Murder attack on security guard for committing seven robberies in one night: Two arrested | एकाच रात्रीत सात जबरी चोऱ्या करीत सुरक्षा रक्षकावर खूनी हल्ला: दोघांना अटक

चितळसर पोलिसांची कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देचितळसर पोलिसांची कारवाईदोघेही निघाले अल्पवयीन

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एकाच रात्रीत सात जबरी चोºया करीत सुरक्षा रक्षकावरही चाकूचे वार करुन त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणाºया दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुलांना चितळसर पोसिलांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात मोबाईल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी गुरुवारी दिली.
चितळसर, मानपाडा येथील जयभवानीनगर भागात राहणाºया या दोघांनी १७ जानेवारी २०२१ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मानपाडा येथील एका रिक्षा चालकाकडून मोबाईल आणि काही रोकड जबरीने हिसकावून मोटारसायकलीवरुन पलायन केले. त्यानंतर पुन्हा एक तासाच्या अंतराने त्याच भागातील शुभारंभ सोसायटीमधील एका सुरक्षा रक्षकाकडूनही त्यांनी मोबाईल आणि रोकड हिसकावून पळ काढला. तिसºया घटनेमध्ये १८ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास एका रिक्षा चालकाकडून ४५० रुपयांची रोकड लुबाडली. पुढे मानपाडा येथील एमएमआरडीएच्या दोस्ती रेंटलमधील एका घराची खिडकी उचकटत असतांना त्यांना हटकणाºया सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकाच्या छातीवर आणि पोटावर त्यांनी चाकूने वार केला. त्याच काळात त्यांनी वर्तकनगर भागात दोन आणि नौपाडा भागातील एका ठिकाणी जबरी चोरीचा प्रकार केला. एकाच रात्रीमध्ये अवघ्या काही तासांच्या अंतराने ही लुटमार सुरु असल्याची माहिती चितळसर पोलिसांना ठाणे नियंत्रण कक्षातून मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे यांच्या पथकाने या दोघांनाही पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात मोबाईल, मोटारसायकल आणि दोन सुरे असा एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे राठोड यांनी सांगितले.

Web Title: Murder attack on security guard for committing seven robberies in one night: Two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.