दारु पिण्याच्या कारणावरुन हत्या, हल्ला करणाऱ्यांसह अन्य दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 03:45 PM2022-12-09T15:45:50+5:302022-12-09T15:46:48+5:30
या प्रकरणी जगदीश नरहिरे, वैभव जगताप, अजय धोत्रे, राकेश हागरगी, प्रदीप चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे
ठाणे : दारु पिण्याच्या कारणावरून वर्तकनगर भागात एकाची चाकूने वार करु न हत्या करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी रात्नी उघडकीस आला आहे. या चाकू हल्यात दिपक निरभवणो याचा जागीच मृत्यु झाला आहे. तर त्याच्या सोबत असलेले दोघे जण जखमी असून हल्ला करणाराही यात जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.
या प्रकरणी जगदीश नरहिरे, वैभव जगताप, अजय धोत्रे, राकेश हागरगी, प्रदीप चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. १५ ते २० दिवसांपूर्वी दिपक निरभवणो, प्रशांत निरभवणो, त्यांचा मावस भाऊ विलास पवार यांचे याच परिसरात राहणा:या जगदीश, वैभव, अजय, राकेश, प्रदीप यांच्यासोबत दारु पिण्याच्या कारणावरु न वाद झाले होते. बुधवारी रात्नी भिमनगर येथील साईनाथनगर परिसरात दिपक, प्रशांत आणि विलास हे बोलत असताना जगदीश, वैभव आणि राकेश यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरु वात केली. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यावेळी जगदीशने त्याच्याजवळील चाकूने दिपकच्या छातीत वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जगदीशने विलास आणि प्रशांतवरही चाकूने हल्ला करून त्यांना सळईने मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत जगदीशही जखमी झाला. प्रशांत व विलासला उपचारासाठी कळवा येथील छत्नपती शिवाजी महाराज रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जगदीशला जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.