सोसायटीचा हिशेब मागितल्याने रहिवाशाची हत्या, सचिवाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 06:43 AM2017-11-23T06:43:00+5:302017-11-23T06:43:13+5:30
रहिवाशास मारहाण करून त्याची हत्या केल्याप्रकरणी, गृहनिर्माण संस्थेच्या सचिवासह त्याच्या दोन मुलांना नयानगर पोलिसांनी अटक केली आहे.
मीरा रोड : ‘आधी गृहनिर्माण संस्थेच्या जमाखर्चाचा हिशेब द्या, मग रंगकामासाठी पैसे मागा,’ असे सांगितल्याचा राग मनात ठेवून, रहिवाशास मारहाण करून त्याची हत्या केल्याप्रकरणी, गृहनिर्माण संस्थेच्या सचिवासह त्याच्या दोन मुलांना नयानगर पोलिसांनी अटक केली आहे.
नयानगरमधील गंगा कॉम्प्लेक्समध्ये चंद्रश रिवेरा नावाची गृहनिर्माण संस्था आहे. यामध्ये ४८ सदनिका आहेत. या इमारतीची दुरुस्ती आणि रंगरंगोटीसाठी सर्व सदनिकाधारकांकडून पैसे काढायचे ठरले होते, परंतु सहाव्या मजल्यावरील सदनिकेत सुमारे १८ वर्षांपासून एकत्र राहणारे सुरय्या वजीर शेख (५०) व जब्बार गफ्फार भाटी (४५) यांनी मात्र, त्यांच्या वाट्याला येणारे १४ हजार रुपये भरण्यास असमर्थता व्यक्त केली. संस्थेकडे सदस्य नियमित देखभाल-दुरुस्तीचे पैसे भरतात. सदनिका हस्तांतर, भाड्यासाठी आलेले पैसेही जमा आहेत. आधी सर्व पैशांचा हिशेब द्या, असा पवित्रा जब्बार व सुरय्या यांनी घेतला होता. त्यातच, आम्ही मेहनत करून कर्ज फेडून घर चालवितो, पण यांच्या घरात कोणताही कामधंदा न करता दोन-दोन एसी, घरकामासाठी बाई ठेवता, यासाठी पैसा येतो कुठून, असा सवाल सुरय्या यांनी संस्थेचे सचिव अब्दुल मुखीम खान (५०) यांच्याकडे बोट दाखवित केला होता.
मंगळवारी रात्री उशिरा जब्बार हे एका रहिवाशासोबत याच विषयावर बोलत होते. सोसायटीच्या सचिवाने पैसे खाल्ले, काम बरोबर करत नाहीत, असे जब्बार बोलत होते. त्याचा राग येऊन अब्दुलने जब्बारला मारहाण केली.
सचिव, मुलांची कायम दहशत
ही सदनिका जब्बार यांच्या नावेच होती. दोन वर्षांपूर्वी
ती माझ्या नावे त्यांनी
केली होती. सचिव अब्दुल
व मुले नेहमी मनमानी व दादागिरी करत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणी बोलत नसे, असे सुरय्या म्हणाल्या.
आरोपीने
केला कांगावा
जब्बार खाली पडल्याचे पाहून इमरान यानेच ठाणे ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करून मारामारी झाल्याचे कळविले तसेच नयानगर पोलीस ठाण्यात धाव घेत, इमरानने आपणास दुखापत झाल्याचा कांगावा केला; परंतु सुरय्याने
घडला प्रकार पोलिसांना सांगितल्यावर, अब्दुल, इमरान व मोहसीम यांना पोलिसांनी अटक केली.
वाद होत असल्याचे
पाहून अब्दुलची मुले इमरान (२७) व मोहसीम (३४) देखील खाली आले. त्यांनीही जब्बार यांना मारहाण केली. त्यात स्टीलच्या खुर्चीवर जोरात आदळून जब्बार
यांचा मृत्यू झाला.