चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून: पतीस अखेर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 09:29 PM2021-08-02T21:29:09+5:302021-08-02T21:31:29+5:30
चारित्र्याच्या संशयातून माधूरी संजय पाटील (३१, रा. कळवा, ठाणे) या पत्नीचा खून करणाऱ्या कथित आरोपी पती संजय (३९) याला कळवा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. उपनिरीक्षक शिरीष यादव यांच्या पथकाने उत्तरप्रदेशातील वाराणसी येथून ३१ जुलै रोजी त्याला ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: चारित्र्याच्या संशयातून माधूरी संजय पाटील (३१, रा. कळवा, ठाणे) या पत्नीचा खून करणाऱ्या कथित आरोपी पती संजय (३९) याला कळवा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याला ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कळवा येथील सुकूर पार्कमधील बी या इमारतीमधील दुसºया मजल्यावर राहणाºया संजय याने पत्नी माधुरी हिच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करुन खून करुन पसार झाला होता. हा प्रकार २३ जुलै रोजी सायंकाळी ६.३० ते २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला होता. माहेरच्या मंडळींनी तिला संपर्क साधूनही तो न झाल्यामुळे २४ जुलै रोजी हा प्रकार उघड झाला.
संजय कोणताही कामधंदा करीत नव्हता. त्याला कर्जही झाले होते. त्याने काही जणांची फसवणूकही केल्याने त्याच्याविरुद्ध नौपाडा आणि वागळे इस्टेट या दोन पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूकीचे गुन्हेही दाखल आहेत. दरम्यान, घरातील क्षुल्लक बाबींवरुन या दाम्पत्यांमध्ये नेहमीच खटके उडत होते. ती पार्लरमध्ये काम करीत असूनही तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच त्यांच्यात २३ जुलै रोजी सायंकाळी ६ ते २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान वाद झाला. हाच वाद चिघळल्याने त्याने माधूरीच्या डोक्यात हातोडयाने प्रहार करून तिचा खून केला. हत्येनंतर त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीला त्याने शेजाऱ्यांकडे ठेवून मोबाईल बंद करुन पसार झाला होता. याप्रकरणी २५ जुलै रोजी कळवा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी आणि निरीक्षक सुदेश अजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर गोंटे आणि उपनिरीक्षक शिरीष यादव यांच्या पथकाने उत्तरप्रदेशातील वाराणसी येथून ३१ जुलै रोजी त्याला ताब्यात घेतले.