एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, मारेकरी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 06:12 AM2018-08-05T06:12:22+5:302018-08-05T06:13:15+5:30

दुचाकीवरून कामावर चाललेल्या प्राची विकास झाडे (२१) हिची एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी येथे घडली.

The murder of a woman, one of the killers, | एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, मारेकरी गजाआड

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, मारेकरी गजाआड

Next

ठाणे : दुचाकीवरून कामावर चाललेल्या प्राची विकास झाडे (२१) हिची एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी येथे घडली. हल्लेखोर आकाश पवार (२५) याने भरधाव बसखाली आत्महत्येचा प्रयत्न केला. तो बचावल्यानंतर त्याने तेथून पळ काढला होता. काही तासांनी पोलिसांनी त्याला अटक केली.
हत्येसाठी त्याने दोन चाकू आणले होते. त्याने प्राचीवर नऊ वार केल्याची माहिती ठाणे शहर परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी दिली. ठाणे पूर्वेकडील कोपरीत राहणारी प्राची ठाणे महाविद्यालयात एस.वाय.बी.कॉम.ला होती. घोडबंदरकडे ती दुचाकीवरून जात असताना आकाशने ११ वाजण्याच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गावर आरटीओ कार्यालयासमोर तिच्या पाठीवर वार केला. त्यानंतर पोटावर वार केले. प्राची रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर आकाशने बसखाली आत्महत्येचा प्रयत्न केला. पण सुदैवाने तो बचावला. त्याच्या डोक्याला मार लागला. तो तेथून पळाला. उपचारादरम्यान प्राचीचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजद्वारे आकाशची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याला परिसरातून अटक केली.
>आकाश पवारविरोधात
यापूर्वी पोलिसात तक्रार
आकाश हा प्राचीवर एकतफर् ी प्रेम करत होता. तो नेहमी तिचा आणि तिच्या मैत्रिणीचा पाठलाग करायचा. त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी प्राची व तिच्या मैत्रिणीने कापूरबावडी पोलिसांत तक्र ार दिली होती.
तेव्हा प्रतिबंधात्मक कारवाई केली होती, असे पोलिसांनी सांगितले, तर तिच्या नातेवाइकांनी पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप केला आहे.
>पाच पथके तयार केली
हत्येनंतर मारेकऱ्याची ओळख पटली. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पाच पथके तयार केली होती. एक पथक कॉलेज, दुसरे कोपरी, तिसरे वागळे इस्टेट, चौथे पथक आकाश राहत असलेल्या काल्हेर येथे रवाना झाले होते, तर पाचवे पोलिसांचे पथक सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम करत होते.

Web Title: The murder of a woman, one of the killers,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.