अंबरनाथमधील तरुणाची हत्या, पोलिसांनी काही तासांतच केला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 10:25 PM2022-01-02T22:25:36+5:302022-01-02T22:39:10+5:30

अंबरनाथ शहरातील पश्चिम भागात असलेल्या वूलन मिल कंपाउंडमध्ये रविवारी सकाळी एका अज्ञात तरुणाचा दगडाने डोकं ठेचलेला मृतदेह आढळून आला होता.

The murder of a young man in Ambernath was revealed by the police within a few hours | अंबरनाथमधील तरुणाची हत्या, पोलिसांनी काही तासांतच केला उलगडा

अंबरनाथमधील तरुणाची हत्या, पोलिसांनी काही तासांतच केला उलगडा

Next
ठळक मुद्देमयत तरुण रवी तिवारी आणि समीर आसिफ मोमीन यांच्यात एका कंपनीत लेबर कॉट्रॅक्ट घेण्यावरून अनेकदा वाद झाले होते. काल समीर हा मयत रवी याला दारू पिण्यासाठी म्हणून वूलन मिल कंपाउंडच्या मैदानात घेऊन आला

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा पोलिसांनी काही तासातच उलगडा करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्ट घेण्याच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

अंबरनाथ शहरातील पश्चिम भागात असलेल्या वूलन मिल कंपाउंडमध्ये रविवारी सकाळी एका अज्ञात तरुणाचा दगडाने डोकं ठेचलेला मृतदेह आढळून आला होता. या तरुणाची ओळख पटवली असता त्याचे नाव रवी तिवारी असल्याचे समोर आले. यानंतर रवी याचा पत्ता शोधत तो काल रात्री कुणासोबत होता, याची माहिती पोलिसांनी घेतली. त्यानुसार पोलिसांनी समीर आसिफ मोमीन या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपणच ही हत्या केल्याची कबूली दिली. मयत तरुण रवी तिवारी आणि समीर आसिफ मोमीन यांच्यात एका कंपनीत लेबर कॉट्रॅक्ट घेण्यावरून अनेकदा वाद झाले होते. काल समीर हा मयत रवी याला दारू पिण्यासाठी म्हणून वूलन मिल कंपाउंडच्या मैदानात घेऊन आला. तिथे रवी याला भरपूर दारू पाजत समीर याने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. दरम्यान, समीर याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार असून या हत्येत त्याच्यासोबत आणखी कुणी सहभागी होते का? हे तपासात समोर येणार आहे. 

Web Title: The murder of a young man in Ambernath was revealed by the police within a few hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.