पोलीस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून ठाण्यात व्यावसायिकावर खूनी हल्ला

By अजित मांडके | Published: August 21, 2023 03:38 PM2023-08-21T15:38:16+5:302023-08-21T15:39:39+5:30

ठाण्याच्या पाचपाखाडीतील रहिवाशी गणेश याने दिलेल्या तक्रारीनुसार १९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास अन्नपूर्णा दुकानाचे मालक प्रदीप करडे (५१) यांचे अभय मोरे याच्याबरोबर भांडण झाले होते.

Murderous attack on businessman in police station out of anger for complaining in police station | पोलीस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून ठाण्यात व्यावसायिकावर खूनी हल्ला

पोलीस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून ठाण्यात व्यावसायिकावर खूनी हल्ला

googlenewsNext

ठाणे: आदल्या दिवशी झालेल्या भांडणाची पोलिस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून अन्नपूर्णा दुकानाचे मालक प्रदीप करडे यांना अभय मोरे याने शिवीगाळी केली होती. याचाच जाब विचारणाºया गणेश शेलार (३०, रा. पाचपाखाडी, ठाणे) याच्या डाव्या गालावर अभय याने चाकूने खूनी हल्ला केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी अभय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी सोमवारी दिली.

ठाण्याच्या पाचपाखाडीतील रहिवाशी गणेश याने दिलेल्या तक्रारीनुसार १९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास अन्नपूर्णा दुकानाचे मालक प्रदीप करडे (५१) यांचे अभय मोरे याच्याबरोबर भांडण झाले होते. त्याबाबत त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्याचदिवशी (१९ ऑगस्ट रोजी) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास करडे हे त्यांच्या दुकानातील कामगार गणेश शेलार यांना घेऊन या दुकानाजवळ आले. त्यावेळी अभय हा देखील तिथे आला होता.

अभयने करडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेंव्हा गणेशने त्यांना शिवीगाळ का करतोस? अशी विचारणा केली. त्यानंतर मात्र त्याने गणेशच्या पोटावर वार केला. तो चुकवून त्यास पकडण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतू, त्याने गणेशच्या डाव्या गालावर वार करुन तिथून पसार झाला. गणेशला आता उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी २० आॅगस्ट रोजी अभय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Murderous attack on businessman in police station out of anger for complaining in police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.