ठाण्यात रंगणार इशान घोश व भाग्येश मराठे या तरु ण संगीतकारांची मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 03:59 PM2017-12-02T15:59:51+5:302017-12-02T16:05:23+5:30
बडिंग स्टार्स या स्वरयात्रा आणि भगवानदास पेराज फाऊण्डेशन प्रस्तूत मैफलीत तरु ण संगीतकारांची मैफल रंगणार आहे.
ठाणे: बडिंग स्टार्स या स्वरयात्रा आणि भगवानदास पेराज फाऊण्डेशन प्रस्तूत मैफलीत भारतीय शास्त्रीय संगीतातील तरु ण चेहºयांना संधी दिली जाते. यावेळी मैफल गाजवणार आहे तबलजी इशान घोश आणि गायक भाग्येश मराठे... या तरु ण संगीतकारांची मैफल रविवार १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुसरा मजला, सहयोग मंदीर, घंटाळी, ठाणे (पश्चिम) येथे रंगणार आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून ही मैफल सर्वांसाठी खुली आहे.
पहिल्या सत्रात संवादिनीवर सिद्धेश बिचोलकर यांच्या साथीने इशान घोष यांचे एकेरी तबलावादन होणार आहे. पारंपरिक संगीत संस्कृतीचाच एक भाग असलेल्या आणि संगीत वारसाची सातवी पिढी तरु ण तबलजी इशान घोष याने भारतीय शास्त्रीय संगिताच्या क्षितीजावर स्वत:चे रंग भरण्यास आधीच सुरूवात केली आहे. त्याने वयाच्या दोन-अडीचाव्या वर्षी आपली पहिली एकेरी तबला मैफल गाजवली. दुसरे सत्र भाग्येश मराठे याच्या गायनाने रंगणार आहे. तबल्यावर ऋग्वेद देशपांडे आणि संवादिनीवर सिद्धेश बिचोलकर यांची साथ लाभणार आहे. ज्येष्ठ गायक पं. राम मराठे यांचा नातू असलेल्या भाग्येश मराठे याने वयाच्या चौथ्या वर्षा तबला शिकण्यास सुरूवात केली आणि हे प्रशिक्षण पुढील पंधरा वर्षे सुरू ठेवले. स्वरयात्राचे संस्थापक मनोज मांडलीकर म्हणाले, तरु ण संगीतकार, गायक आणि वादकांना आपली कला सादर करण्याची संधी देता यावी, यासाठी पाच वर्षांपूर्वी एक व्यापक व्यासपीठ म्हणून स्वरयात्राची स्थापना केली. वरील प्रत्येक कलाकाराकडे आपली कला व्यक्त करण्याची त्या-त्या परंपरेला धरून ठेवलेली स्वत:ची अशी एक शैली आहे. परंपरा जपत असताना त्यातून नवीन काही निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांचे दिग्गज मंडळींनी कौतुक केले आहे.