कल्याणच्या मुस्लीम सामाजिक संस्थेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:36 AM2021-07-26T04:36:03+5:302021-07-26T04:36:03+5:30
कल्याण : कल्याणची रहबर ग्रुप ही सामाजिक संस्था कोकणातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आली आहे. या संस्थेतर्फे चिपळूण, ...
कल्याण : कल्याणची रहबर ग्रुप ही सामाजिक संस्था कोकणातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आली आहे. या संस्थेतर्फे चिपळूण, महाड, रत्नागिरी भागातील पूरग्रस्तांना जवळपास २२ टन जीवनावश्यक वस्तू पाठविल्या जाणार आहेत. या वस्तूंनी भरलेले दोन ट्रक सोमवारी कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहेत.
संस्थेचे प्रमुख अहमद कामले आणि अब्दुल गफ्फार शेख यांनी सांगितले की, निसर्गाचा प्रकोप झाल्याने नैसर्गिक आपत्तीत अनेकांना जीव गमवावे लागले. जे लोक बचावले आहेत, त्यांना मदतीचा हात देणे हीच खरी मानवता आहे. पूरग्रस्तांना औषधे, अंथरूण, अन्नधान्य, सॅनिटायझर, महिलांना सॅनिटरी नॅपकीन, कपडे, चटई, बेडशीट, लहान मुलांना दुधाची बाटली आदी साहित्य दिले जाणार आहे. हे साहित्य घेऊन ग्रुपचे कार्यकर्ते फैज उल्लेक, जिशान मुल्ला, हन्जला खान, बिलाल शेख आदी कोकणात रवाना होणार आहेत.
फाेटाे-कल्याण-मदत
-------------