बनावट सोने गहाण ठेवून मुथुट फायनान्सची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 04:30 AM2018-07-07T04:30:49+5:302018-07-07T04:30:58+5:30
बनावट सोने गहाण ठेवून मुथुट फायनान्सची फसवणूक केल्याप्रकरणी कळव्यातील एका आरोपीविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. या प्रकरणामध्ये मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
ठाणे : बनावट सोने गहाण ठेवून मुथुट फायनान्सची फसवणूक केल्याप्रकरणी कळव्यातील एका आरोपीविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. या प्रकरणामध्ये मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
मुथुट फायनान्स कंपनीची ठाण्यातील गोखले रोडवर शाखा आहे. रोहित सुर्वे हे ठाण्याचे शाखा व्यवस्थापक असून त्यांच्या नियंत्रणातील दोन कर्मचाऱ्यांकडे ग्राहकांचे सोने तपासण्याची जबाबदारी आहे. २२ मे रोजी कळव्यातील मनीषनगरात राहणारा सुशांत साळवी हा या शाखेमध्ये गेला. माझी आई आजारी असून सोने गहाण ठेवून मला तातडीने कर्ज द्या, अशी विनंती त्याने केली. त्याने ७१ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन चेन शाखेतील कर्मचाºयांना दिल्या. कर्मचाºयांनी त्यांच्याकडून वैयक्तिक कर्जासाठीचा अर्ज आणि घोषणापत्र भरून घेतले. सुशांतची आणि त्याने दिलेल्या सोन्याची तपशीलवार माहिती तसेच पॅनकार्ड आणि आधारकार्डची छायांकित प्रत कर्मचाºयांनी घेतली. त्यानंतर,दोघांनी साळवीने दिलेल्या दोन्ही चेन काळ्या दगडावर घासल्या. तसेच नायट्रिक अॅसिड आणि मिठाचे पाणी टाकूनही सोन्याची तपासणी केली. त्या खºया असल्याची खात्री पटल्यानंतर एक लाख ५० हजार रुपये त्याच्या खात्यावर जमा करण्यात आले.
५ जून रोजी मुथुट फायनान्स कंपनीचे लेखापरीक्षक ठाणे शाखेत आले. त्यांनी शाखेतील सर्व सोन्याची गुणवत्ता तपासली. त्यावेळी सुशांत साळवीने दिलेल्या चेन सोन्याच्या नसून चांदीच्या असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चेनला सोन्याचा केवळ मुलामा देण्यात आला होता. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर ५ जुलै रोजी मुथुटचे ठाणे शाखा व्यवस्थापक रोहित सुर्वे यांनी नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, नौपाडा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
कर्मचाºयांच्या भूमिकेवर संशय
आरोपी सुशांतने मुथुट फायनान्सकडे सोन्याच्या चेन तारण ठेवल्या, त्यावेळी दोन्ही चेन खºया असल्याची खात्री कर्मचाºयांनी पटवली होती. त्यानंतर, त्या बनावट असल्याचे कंपनीच्या लेखापरीक्षकाच्या लक्षात आले. जी बाब लेखापरीक्षकाच्या लक्षात येऊ शकते, ती कर्मचाºयांच्या लक्षात का आली नाही, या मुद्यावरही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आवश्यकतेनुसार मुथुटच्या कर्मचाºयांचीही चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.