जीन्स पॅन्टची परस्पर विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:37 AM2021-03-07T04:37:37+5:302021-03-07T04:37:37+5:30
उल्हासनगर : कॅम्प नं-५ वसंत बहार परिसरात महेश खत्री यांचे जी. के. गारमेंट नावाचे दुकान आहे. त्यांच्या ओळखीचे असलेले ...
उल्हासनगर : कॅम्प नं-५ वसंत बहार परिसरात महेश खत्री यांचे जी. के. गारमेंट नावाचे दुकान आहे. त्यांच्या ओळखीचे असलेले मुकेश पंजुमल लोकवानी यांनी खत्री यांचा विश्वास संपादन करून ऑगस्ट २०१९ ते १९ फेब्रुवारी २०२१ दरम्यान १ लाख ८७ हजार ६९२ रुपये किमतीच्या जीन्स घेतल्या. दरम्यान, पॅन्टची परस्पर विक्री करून अपहार केला. हा प्रकार उघड झाल्यावर खत्री यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
-----------------------;
नाल्यांची दुरुस्ती
उल्हासनगर : प्रभाग क्र-१८ च्या नगरसेविका व प्रभाग समिती क्र-४ च्या सभापती अंजली साळवे यांनी प्रभागातील नादुरुस्त असलेल्या नाल्याच्या दुरुस्तीची मागणी महापालिकेकडे लावून धरली होती. अखेर महापालिकेने मंजूर केलेल्या निधीतून नाल्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. नाल्याच्या दुरुस्तीनानंतर रस्ते दुरुस्तीकडे लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती साळवे यांनी दिली.
----------------------
नाल्यांची साफसफाई
उल्हासनगर : महापालिका पावसाळ्याच्या तोंडावर लहान-मोठ्या नाल्यांची सफाई करते. यावर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेने नालेसफाईचे काम सुरू केले असून, वर्षातून तीन टप्प्यांत नालेसफाई होणार असल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार यांनी दिली आहे.
----------------------
भुयार गटार व रस्त्याची मागणी
उल्हासनगर : कॅम्प नं-४ परिसरातील हिंदू स्मशानभूमीसमोरील रस्त्याची दुरवस्था झाली असून, भुयारी गटाराचे झाकण तुटल्याने अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी भुयारी गटारील झाकण लावण्याचे व रस्ता दुरुस्तीची मागणी महापालिकेकडे केली आहे. स्मशानभूमी सभोवतालच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून, पुढील महिन्यात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती नगरसेवक भरत गंगोत्री यांनी दिली आहे.
-----------------------------