येऊरमध्ये ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:10+5:302021-06-10T04:27:10+5:30

ठाणे : शहरालगत असलेल्या येऊरच्या डोंगराळ भागात जैवविविधता व पश्चिम घाटातील अनेक वनस्पती पाहावयास मिळतात. परंतु, अलीकडच्या काळात येथील ...

‘My Garbage, My Responsibility’ campaign in Yeoor | येऊरमध्ये ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ मोहीम

येऊरमध्ये ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ मोहीम

googlenewsNext

ठाणे : शहरालगत असलेल्या येऊरच्या डोंगराळ भागात जैवविविधता व पश्चिम घाटातील अनेक वनस्पती पाहावयास मिळतात. परंतु, अलीकडच्या काळात येथील निसर्ग हा मानवी चुकांमुळे दूषित होत चालला आहे. प्रदूषणापासून येऊरला वाचविण्यासाठी एकलव्य क्रीडा मंडळ आणि येऊर संवर्धन समिती यांनी ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तीन ट्रक कचरा उचलला आहे.

येऊर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक भाग आहे आणि येऊरचा निसर्ग ही ठाण्याची ओळख आहे. योग्य ती काळजी घेतली तरच हा सुंदर निसर्गसौंदर्य आपण आपल्या पुढच्या पिढीला दाखवू शकू. अन्यथा हा निसर्ग लोप पावत जाईल.

गेल्या काही वर्षांत या ठिकाणी वाढत असलेले बंगले, हॉटेल यामुळे कचरादेखील वाढू लागला आहे. तो ओढ्यात फेकून थेट जंगलात जाऊन त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचवित असल्याचे येऊरचे रहिवासी आणि एकलव्य क्रीडा मंडळ आणि येऊर संवर्धन समितीचे संस्थापक-अध्यक्ष किशोर म्हात्रे यांनी सांगितले. म्हात्रे यांनी स्वतः पुढाकार घेऊन मार्च महिन्यापासून त्यांचे सहकारी शिक्षक आणि खेळाडूंच्या मदतीने कचरा उचलण्याची मोहीम हाती घेतली. मे महिन्यापर्यंत ते शनिवारी आणि रविवारी ही मोहीम राबवित. परंतु, पावसाचे दिवस सुरू झाल्याने या मोहिमेला गती यावी म्हणून रोज सकाळी ते कचरा उचलून जंगल प्रदूषणमुक्त ठेवण्याचे काम करीत आहेत.

येऊरमध्ये बंगल्यात येणारे लोक, तसेच पार्टीला येणारे लोक बाटल्या, प्लास्टिक व इतर कचरा तसाच फेकून देतात. त्यामुळे दुपटीने कचरा वाढत आहे. विल्हेवाट लागत नसल्याने तो तसाच पडून राहतो, याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यामुळे आपला कचरा ही आपलीच जबाबदारी असल्याची जनजागृती म्हात्रे आणि त्यांची संस्था करीत आहे. पालिका प्रशासनाला सांगून त्यांनी घंटागाडीची वारंवारतादेखील वाढवली आहे.

----------------------

Web Title: ‘My Garbage, My Responsibility’ campaign in Yeoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.