अपघाताच्या तपासातून उलगडले खुनाचे रहस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 04:59 AM2017-12-29T04:59:08+5:302017-12-29T04:59:16+5:30

ठाणे : पहाटे फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या एका व्यावसायिकास कारने धडक दिल्याच्या गत महिन्यातील घटनेच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.

The mystery of the unraveled murder of the accident | अपघाताच्या तपासातून उलगडले खुनाचे रहस्य

अपघाताच्या तपासातून उलगडले खुनाचे रहस्य

Next

ठाणे : पहाटे फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या एका व्यावसायिकास कारने धडक दिल्याच्या गत महिन्यातील घटनेच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात नसून अनैतिक संबंधांतून केलेला खून असल्याचा दावा कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
ठाण्यातील आझादनगरातील रामजी छत्रधारी शर्मा (४६) हे १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ब्रह्मांड येथील तुलसी हॉटेलसमोर फेरफटका मारत असताना पांढºया रंगाच्या एका कारने त्यांना धडक दिली. या अपघातात शर्मा गंभीर जखमी झाले. कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) नासीर कुळकर्णी हे या प्रकरणाचा तपास करत असताना रामजी शर्मा एक सलून चालवत असून त्यांचे एका महिलेशी संबंध होते, अशी माहिती समोर आली. अपघाताच्या वेळी ती महिलाही तिच्या पतीसोबत तिथेच पायी फिरत होती, अशी माहिती रामजीच्या चुलत भावाने पोलिसांना दिली होती. या त्रोटक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासचक्र फिरवले. घटनास्थळाहून पोलिसांनी रामजींना धडक देणाºया कारच्या डाव्या बाजूचा आरसा आणि फॉग लॅम्प हस्तगत केला.
रामजींच्या चुलत भावाने ज्या महिलेवर संशय व्यक्त केला होता, त्या महिलेचा सीडीआर (कॉल डिटेल्स) पोलिसांनी तपासला. तिचे नळपाड्यातील जयप्रकाश मंगरू चौहान याच्याशी संबंध होते. ही महिला जयप्रकाश चौहानच्या नियमित संपर्कात होती. रामजी यांना कारने धडक दिल्यानंतर मोबाइल फोन बंद करून जयप्रकाश फरार झाल्याचेही पोलिसांना तपासामध्ये समजले. पोलिसांनी त्याची कार हस्तगत केली.

Web Title: The mystery of the unraveled murder of the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून