पाकिस्तानातून परतलेली नगमा अखेर गजाआड; बनावट कागदपत्रांद्वारे मिळवला पासपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 07:25 IST2024-07-27T07:22:31+5:302024-07-27T07:25:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार करून पाकिस्तानला गेलेल्या नगमा खान हिच्यासह कागदपत्र बनवून देणाऱ्या ...

पाकिस्तानातून परतलेली नगमा अखेर गजाआड; बनावट कागदपत्रांद्वारे मिळवला पासपोर्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार करून पाकिस्तानला गेलेल्या नगमा खान हिच्यासह कागदपत्र बनवून देणाऱ्या राठोड या तरुणाला वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. नगमा खान हिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दोन मुलांची आई असलेली नगमा पाकिस्तानात जाऊन गुपचूप निकाह करून काही दिवसांपूर्वीच पुन्हा ठाण्यात परतली. पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी तिने पासपोर्ट आणि व्हिसा तयार केला. या कागदपत्रांबाबत केंद्रीय तपास यंत्रणांना संशय आल्यानंतर त्यांनी या महिलेची माहिती मागवली. त्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार केल्याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
ही बनावट कागदपत्रे पासपोर्ट अर्जासोबत जोडून तिने हा अर्ज पासपोर्ट कार्यालयासह वर्तकनगर पोलिस ठाण्यात सादर केला होता. त्या आधारे तिने पाकिस्तानचा व्हिसा प्राप्त केला. ठाणे पोलिसांनी गुरुवारी तिला अटक करून न्यायालयात हजर केले असता तेथे तिला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. चौकशीनंतर तिला बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या राठोड या तरुणालाही शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.