पाच मेपासून सुरूवात होणार नालेसफाईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 05:29 AM2018-04-25T05:29:45+5:302018-04-25T05:29:45+5:30

कंत्राटदारांची संख्या होणार कमी : पालिका झोपडपट्टीत जाऊन गोळा करणार कचरा, १० कोटींची तरतूद

Nalasefai will start from May 5 | पाच मेपासून सुरूवात होणार नालेसफाईला

पाच मेपासून सुरूवात होणार नालेसफाईला

Next

ठाणे : शहरातील ११९ किमीच्या ३०६ नाल्यांच्या सफाईस येत्या ५ मे पासून सुरुवात होणार आहे. ती झाल्यानंतरही बाजूच्या झोपडपट्टींतून पुन्हा कचरा टाकण्यात येत असल्याने आता यावर उपाय म्हणून या भागात घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भात घरांचा सर्व्हे केला जाणार असून त्यानंतर घरोघरी जाण्यासाठी कचरावेचकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नाल्यामध्ये प्लास्टिक टाकण्यात येत असल्याने ते तुंबण्याचे प्रकार होत होते. मात्र, आता प्लास्टिक बंदी नंतर काही प्रमाणात ते तुंबण्याचे प्रकार थांबणार असल्याचा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. यावर्षीदेखील नालेसफाईसाठी १० कोटींची तरतूद केली आहे. परंतु, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ठेकेदारांची संख्या कमी झाली आहे.
प्रभाग समिती निहाय नालेसफाईच्या कामाचे नियोजन केले असून यासाठी गेल्यावर्षी ६५ ठेकेदारांची नियुक्ती केली होती. यंदा मात्र, ठेकेदारांची संख्या कमी केली आहे. गुढी पाडव्यापासून प्लास्टिक बंदी केल्याने आता यावर्षी नाले तुंबण्याचे प्रमाण कमी होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, याचा परिणाम पुढच्या नालेसफाईमध्ये दिसेल असेही स्पष्ट केले आहे. आता नाल्यांमध्ये आहे ते प्लास्टिक काढल्यानंतर पुढच्या नालेसफाईमध्ये मात्र हा त्रास कमी होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नालेसफाईनंतर येणारी मुख्य समस्या म्हणजे सफाई झाल्यानंतर झोपडपट्टीमधील नागरिक विशेष करून नाल्याच्या बाजूला असलेले नागरिक पुन्हा कचरा टाकत असल्याने सफाई करूनही नाल्यात कचरा साचतो. परिणामी नालेसफाईसाठी खर्च केलेला निधी वाया जातो. यावर उपाय म्हणून कचरावेचकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन तो गोळा केला जाणार आहे. ज्या परिसरात घंटागाडी जाऊ शकत नाही अशा भागातूनच कचरा टाकला जात असल्याने आता स्वत: कचरावेचक तो गोळा करणार आहेत. त्यामुळे आता नाल्यात पडणाºया कचºयाची समस्या निकाली निघणार आहे.
महापालिका हद्दीमधील नालेसफाईची कामे करण्यासाठी निविदा प्रक्रि येच्या कामाला सुरु वात झाली आहे. येत्या आठवडाभरात निविदा काढण्यात येतील, अशी माहिती घनकचरा विभागाने दिली. गेल्यावर्षी नालेसफाईसाठी ६५ ठेकेदारांची नियुक्ती केली होती. यावर्षी मात्र ही संख्या कमी करण्यात येणार आहे.
काही परिसरामध्ये ५ ते १० लाखांची नालेसफाईसाठी ठेकेदारांची नियुक्ती करावी लागत होती. यासाठी प्रक्रि या देखील करावी लागत होती. ती टाळण्यासाठी छोट्या कामांचा समावेश मोठ्या कामातच करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

खाडीचे प्रवाहही होणार साफ
यावर्षी नालेसफाईबरोबरच खाडीचे प्रवाहदेखील साफ केले जाणार आहेत. शहरातील पाच सहा ठिकाणी असे प्रवाह आहेत जे नाल्यांना जोडले गेले आहेत. पूर्वी केवळ खाडी किनारी असलेल्या नाल्यांचे मुख महापालिका साफ करीत होती. मात्र, खाडीपर्यंत जाणारा त्यांचा संपूर्ण प्रवाह साफ न झाल्याने मुख साफ करूनही या प्रवाहामार्गे कचरा पुन्हा नाल्यामध्ये येत होता. यासाठी आता खाडीचे प्रवाहदेखील साफ करण्यात येणार असून यासाठी भरती ओहोटीच्या वेळापत्रकाचा अभ्यास केला जाणार आहे. भरतीच्या वेळी हे प्रवाह साफ करणे शक्य नसल्याने या वेळापत्रकावरच प्रवाहाची सफाई करणे शक्य होणार असल्याचे घनकचरा विभागाने स्पष्ट केले.

नालेसफाईवर जीपीएस आणि कॅमेºयाचा वॉच : गेल्या वर्षीप्रमाणेच ६२ झोन तयार केले आहेत. जीपीएस प्रणाली तसेच कॅमेराचा वॉच यावर्षीदेखील असणार आहे. सफाईनंतरही नाल्यामध्ये कचरा असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी चित्रीकरण करण्यात येणार आहे.

Web Title: Nalasefai will start from May 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस