‘स्वातंत्र्यवीर सावरकर भारतरत्न पुरस्कार असे नामकरण करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:37 AM2021-03-07T04:37:04+5:302021-03-07T04:37:04+5:30
डोंबिवली : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी आमची नाही तर ती शिवसेनेची आहे, तसेच महात्मा जोतिबा ...
डोंबिवली : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी आमची नाही तर ती शिवसेनेची आहे, तसेच महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. पटोले यांच्या त्या मागणीचे समर्थन आहेच, परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्तिमत्त्व सर्व पुरस्कारांनी सन्मानित करण्याच्या पलीकडचे होते. त्यामुळेच त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याऐवजी या सर्वोच्च पुरस्काराच्या नावात बदल करून तो स्वातंत्र्यवीर सावरकर भारतरत्न पुरस्कार या नावाने यापुढे दिला जावा, अशी मागणी ब्राह्मण महासंघ, डोंबिवलीचे अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे यांनी केली आहे. सर्व पक्षांनी त्यांच्या मागणीचे समर्थन करावे, अशी अपेक्षा शुक्रवारी प्रभुघाटे यांनी केली आहे. त्याचबरोबर महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, या मागणीच्या समर्थनार्थ असल्याचे सांगत त्यांनाही सुधारित नावानेच भारतरत्न पुरस्कार द्यावा, असेही ते म्हणाले.