भार्इंदरच्या नाट्यगृहाला कलाम यांचे नाव देणार
By admin | Published: September 5, 2015 10:32 PM2015-09-05T22:32:46+5:302015-09-05T22:32:46+5:30
लिका हद्दीतील चेकनाका परिसरात नुकतेच भूमिपूजन पार पडलेल्या नियोजित नाट्यगृह नामकरणाच्या नाट्यावर शुक्रवारच्या (४ सप्टेंबर) महासभेत भाजपाने मांडलेला दिवंगत माजी राष्ट्रपती
भार्इंदर : पालिका हद्दीतील चेकनाका परिसरात नुकतेच भूमिपूजन पार पडलेल्या नियोजित नाट्यगृह नामकरणाच्या नाट्यावर शुक्रवारच्या (४ सप्टेंबर) महासभेत भाजपाने मांडलेला दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव अखेर बहुमताने मंजूर करण्यात आल्याने पडदा पडला आहे. मात्र, कलाम यांच्याविषयी आदर असल्याचे सांगून शिवसेनेने दादा कोंडकेंच्या नावाचा आग्रह कायम ठेवला आहे.
तत्पूर्वी सत्तेत असलेल्या शिवसेनेने महासभेत विषयान्वये गोषवारा तसेच कोणताही प्रस्ताव नसल्याने रीतसर प्रस्ताव आणण्याच्या मुद्यावर विरोधकांना सहकार्य करून भाजपाविरोधात मतदान केले होते. त्या वेळी सभेत अनुपस्थित भाजपा सदस्यांना आ. नरेंद्र मेहता यांच्या निर्देशानुसार गटनेते शरद पाटील, स्थायी सभापती प्रशांत केळुस्कर यांनी मोबाइलवर संपर्क साधून सभागृहात उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले. त्यामुळे सभागृहात भाजपाची सदस्य संख्या वाढत असतानाच केळुस्कर यांनी नियोजित नाट्यगृहाला कलाम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला. याअगोदर ३० आॅगस्ट झालेल्या नाट्यगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमापूर्वी मेहता व महापौर गीता जैन यांनी पत्रके वाटून नाट्यगृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचे आवाहन केले होते, असे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान मात्र महापौरांनी आपल्या भाषणात अचानक कलाम यांचे नाव नाट्यगृहाला देण्याची मागणी करून नामकरणाच्या राजकारणाला सुरुवात केली होती. त्यात बदल होऊ नये, यासाठीच भाजपाने शुक्रवारच्या महासभेत कलाम यांच्या नावाचा पालिका अधिनियमातील ‘ज’ अन्वये प्रस्ताव आणला होता. कलाम यांचा आदर करून शिवसेनेने भाजपाच्या नामकरण प्रस्तावाला विरोध दर्शविला. त्यासाठी नगरसेविका मंदाकिनी गावंड यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवून त्यात एकमताने नामकरणावर शिक्कामोर्तब करण्याचा ठराव मांडला होता. विरोधकांसह शिवसेनेतील अनुपस्थित सदस्यांमुळे ठराव दोन मतांनी मंजूर झाला. नावाचे राजकारण केल्याचा आरोप शिवसेनेच्या गटनेत्या नीलम ढवण यांनी केला आहे.