मीरा भाईंदर शहरातील रस्ते-वास्तुंना महाराष्ट्रातील मान्यवरांची नावे द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 03:50 PM2020-12-14T15:50:25+5:302020-12-14T15:51:54+5:30

Mira Bhayander : मीरा भाईंदर मध्ये मतांची लाचारी आणि राजकीय फायद्यासाठी महापालिकेच्या रस्ते , चौक , सार्वजनिक वस्तू आदींना नावे देताना ज्यांचा महाराष्ट्राच्या मातीशी संबंध नाही अश्यांची नावे देऊ नयेत अशी मागणी मराठी एकीकरण समितीने महापौर व आयुक्तांना केली आहे .

Name the streets of Mira Bhayander after the names of dignitaries from Maharashtra | मीरा भाईंदर शहरातील रस्ते-वास्तुंना महाराष्ट्रातील मान्यवरांची नावे द्या

मीरा भाईंदर शहरातील रस्ते-वास्तुंना महाराष्ट्रातील मान्यवरांची नावे द्या

Next

 मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये मतांची लाचारी आणि राजकीय फायद्यासाठी महापालिकेच्या रस्ते , चौक , सार्वजनिक वस्तू आदींना नावे देताना ज्यांचा महाराष्ट्राच्या मातीशी संबंध नाही अश्यांची नावे देऊ नयेत अशी मागणी मराठी एकीकरण समितीने महापौर व आयुक्तांना केली आहे .

एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख , प्रदीप सामंत , सचिन घरत आदींच्या शिष्टमंडळाने महापौर ज्योत्सना हसनाळे व आयुक्त डॉ . विजय राठोड यांची गुरुवारी भेट घेतली . ह्या भेटीत हिंदी भाषिक भवन ला तीव्र विरोध कायम असल्याचे पुन्हा सांगत ते रद्द करण्याची मागणी केली .

शहरातील सर्व नामफलक हे मराठी भाषेतून असावे अशी स्पष्ट कायदेशीर तरतूद असूनही त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी . काही राजकारणी व नगरसेवक हे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कोणाचीही नावे शहरातील रस्ते , बेट , उद्याने - मैदाने , पालिका इमारती वा वास्तुंना देत आहेत . वास्तविक राष्ट्रपुरुष वगळता महाराष्ट्राच्या मातीशी संबंध नसणाऱ्यांची नावे देणे निंदनीय असून मराठी मातीतील थोर - मान्यवरांचा अवमान करण्याचा प्रकार आहे . हे अजिबात सहन केले जाणार नाही असे सांगत अशी दिलेली नावे वगळण्यात यावीत अशी मागणी समितीने केली आहे .

ह्या सर्व मुद्द्यां बाबत संयुक्त बैठक नगरपालिकेच्या अधिकारी व मराठी एकीकरण समिती सोबत लावावी अशी मागणी समितीने पुन्हा केली आहे . हिंदी भाषिक भवन सह अन्य मागण्यां बद्दल लवकरच एखादी संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन महापौरांनी दिल्याचे समितीचे अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले .

Web Title: Name the streets of Mira Bhayander after the names of dignitaries from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.