ठाणे महापालिकेच्या डायरीतून महापौरांसह ३४ नगरसेवकांची नावे झाली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 05:30 PM2018-02-28T17:30:21+5:302018-02-28T17:30:21+5:30

ठाणे महापालिकेने प्रसिध्द केलेल्या डायरीतून तब्बल ३४ नगरसेवकांची नावेच गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे. आज झालेल्या महासभेत सदस्यांनी याच मुद्यावरुन प्रशासनाला अडचणीत आणले होते.

The names of 34 corporators, including the Mayor, were missing from Thane Municipal Corporation's Diary | ठाणे महापालिकेच्या डायरीतून महापौरांसह ३४ नगरसेवकांची नावे झाली गायब

ठाणे महापालिकेच्या डायरीतून महापौरांसह ३४ नगरसेवकांची नावे झाली गायब

Next
ठळक मुद्देमहापौरांचे नावही गायबचुक तत्काळ दुरुस्तीचे प्रशासनाने दिले आश्वासन

ठाणे - ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या आपल्या वार्षिक डायरीमध्ये 34 नगरसेवकांची नावेच गायब केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी झालेल्या पलिकेच्या महासभेत उघड झाला आहे. विशेष म्हणजे प्रभाग समिती निहाय प्रसिद्ध करण्यात येणाºया लोकप्रतिनिधींच्या नावामध्ये खुद्द महापौरांचे नाव देखील गायब असल्याची माहिती समोर अली आहे . प्रशासनाच्या वतीने मात्र झालेली चूक तत्काळ दुरु स्त करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण महासभेत देण्यात आले आहे.
                   ठाणे महापालिकेच्या वतीने प्रत्येक वर्षी वार्षिक डायरी प्रसिद्ध केली जाते. यामध्ये महापालिकेच्या सर्व विभागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येते. यामध्ये महापौरांसमवेत पालिका प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि लोप्रतिनिधी यांची नावे प्रसिद्ध केली जातात. यावर्षी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या डायरीमध्ये महापौरांबरोबरच ३४ नगरसेवकांची नावे छापण्यात न आल्याने विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी ठाणे महापालिकेत नगरसेवकांची संख्या किती आहे, असा उपहासात्मक प्रश्न सभागृहात विचारला. त्यानंतर त्यांनी सभागृहात या वर्षीची डायरी देखील दाखवली. अखेर प्रशासनाला ही मोठी चूक लक्षात आल्यानंतर यामध्ये त्वरीत सुधारणा करण्यात येईल अशी माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.


 

Web Title: The names of 34 corporators, including the Mayor, were missing from Thane Municipal Corporation's Diary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.