नावे अद्याप गुलदस्त्यातच

By admin | Published: October 26, 2015 02:25 AM2015-10-26T02:25:29+5:302015-10-26T02:25:29+5:30

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा कॉसमॉस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सुरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा अहवाल अहमदाबाद येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून पोलिसांना प्राप्त झाला आहे.

The names are still in the bouquet | नावे अद्याप गुलदस्त्यातच

नावे अद्याप गुलदस्त्यातच

Next

ठाणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा कॉसमॉस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सुरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा अहवाल अहमदाबाद येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात नजीब मुल्ला, सुधाकर चव्हाण, हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण या चार नगरसेवकांची नावे असल्याचे वृत्त सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवर झळकले. मात्र पोलिसांनी या नावांना अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
गोपनीयतेच्या कारणास्तव अहवालातील तपशील उघड करता येणार नसल्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले. परमार यांनी ७ आॅक्टोबरला स्वत:वर गोळी झाडून कॉसमॉसच्या कासारवडवली येथील एका सॅम्पल फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. त्यांनी सुसाईड नोटमध्ये, बिल्डर्सना विविध परवानग्या देताना काही राजकीय नेते, अधिकारी बळीचा बकरा करतात. माझ्याकडून काही नेते आणि अधिकारी अवास्तव मागण्या करीत होते. त्या पूर्ण करणे मला शक्य नव्हते व त्या पूर्ण करायच्याही
नव्हत्या.
माझ्या आत्महत्येनंतर तरी या यंत्रणेत पारदर्शकता येईल आणि बांधकाम व्यावसायिकांचे शोषण थांबेल, असे म्हटले होते. त्यांनी ज्या ‘गोल्डन गँग’मुळे आपण आत्महत्या करीत असल्याचा दावा केला होता, त्या गँगमधील काहींची नावे लिहून खोडली होती. आपल्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून ही खाडाखोड केली, असेही त्यांनी म्हटले होते.
‘ती’ नोट अहमदाबाद येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली होती. तसेच पोलिसांनी पालिकेचे अज्ञात अधिकारी आणि नगरसेवकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल केला
होता. (प्रतिनिधी)

Web Title: The names are still in the bouquet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.