Maharashtra Voting 2019 : मतदान यंत्रावर नावेच दिसेनात; मतदान करायचे तरी कोणाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 09:16 AM2019-10-21T09:16:22+5:302019-10-21T09:17:33+5:30
ठाण्यामध्ये पावसामुळे मतदान केंद्रांबाहेर चिखल झाला आहे.
ठाणे : राज्यभरात पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळे सोलापूरमध्ये काही मतदान केंद्रांमध्ये पाणी घुसले असून ठाण्यात तर एका मतदान केंद्राच्या परिसरामध्ये वीजच गायब झाली आहे.
ठाण्यामध्ये पावसामुळे मतदान केंद्रांबाहेर चिखल झाला आहे. या चिखलात रांगेत उभे राहून मतदान करावे लागत आहे. अंबिका नगर भागात विद्युत प्रवाह बंद झाला आहे. अर्धा तास झाला तरीही वीज प्रवाह सुरळीत झाला नव्हता. मोबाइल बॅटरीच्या प्रकाशामध्ये मतदान सुरु करण्यात आले आहे. मात्र, यंत्रांच्या ठिकाणी उमेदवारांची नावे दिसत नाही, त्यामुळे अडचणी वाढत आहेत.
तर राज्यभरात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाडाचे वृत्त येत असून अनेक ठिकाणी भर पावतास मतदारांना पावसात ताटकळत रहावे लागत आहे.
बुलढाणा: सिं. राजा मतदार संघ २४ मधील देऊळगांव राजा बुथ क्र .२०५म . फुले येथील मशीनत मतदान सुरू होण्यापुर्वीच बिघाड झाला. येथील मशीन १ तास ४ मिनिटे बंद होती . ८ वाजून ४ मिनिटांनी मतदान सुरू झाले. या मतदान केंद्रावर संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच मतदान होणार आहे. अद्याप कोणाचीही तक्रार नाही.
नांदेड : नांदेड उत्तर- तरोडा बुद्रुक सना उर्दू प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्र.05 येथे सकाळी 7 पासून ईव्हीएम यंत्रात बिघाड झाला आहे. एक तासापासून मतदार पावसात रांगेत उभे आहेत. प्रशासनाची कार्यवाही सुरू असून काही वेळात मतदान सुरळीत होईल, असे अधिकार्याकडून सांगितले जाते.
तर भुसावळ मतदार संघातील कुऱ्हे पानाचे येथे बुथ क्रमांक 280 वरील केंद्रातील ईव्हीएम मशीन मध्ये खराब झाल्यामुळे. तब्बल एक तास 45 मिनिटे मतदारांना तातकळत राहावे लागले. आठ वाजून 45 मिनिटांनी प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला.
भंडारा : तुमसर तालुक्यातील सीतेपर येथे ईव्हीएममध्ये सकाळी ९ वाजता बिघाड. तर जळगाव ग्रामीण मतदार संघात प थ राड या केंद्रात यंत्रात बिघाड. पूर्ण सेट बदलला.