मेट्रो स्थानकासाठी नावे निश्चित, विरोधक अल्पमतात; सत्ताधाºयांची सूचना मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 01:49 AM2017-12-09T01:49:29+5:302017-12-09T01:49:47+5:30
मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रो मार्गावरील ९ स्थानकांची नावे शुक्रवारच्या महासभेत भाजपाच्या बहुमताने निश्चित झाल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहीर केले
भार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रो मार्गावरील ९ स्थानकांची नावे शुक्रवारच्या महासभेत भाजपाच्या बहुमताने निश्चित झाल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहीर केले. यावेळी सेना व काँग्रेसने परिचित असलेली नावेच मेट्रो स्थानकांना देण्याचा ठराव मांडला असता तो अल्पमतात गेला.
एमएमआरडीने निश्चित केलेल्या परिसरातील स्थानकांची नावे सुचवण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला होता. त्या अनुषंगाने भाजपाचे सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी राष्टÑीय महामार्ग (मुंबई-अहमदाबाद महामार्ग) क्रमांक ८ वरील दहिसर चेकनाकाजवळच्या पांडुरंगवाडी व अमर पॅलेस हॉटेल परिसरातील नियोजित स्थानकांना अनुक्रमे पेणकरपाडा व मीरागाव, भार्इंदर पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य मार्गावरील काशिमिरा वाहतूक बेटाजवळच्या झंकार कंपनी येथील स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज, मीरा रोड येथील साईबाबा नगरपरिसरातील स्थानकाला सरदार वल्लभभाई पटेल, दीपक हॉस्पिटल येथील स्थानकाला नानासाहेब धर्माधिकारी, गोल्डन नेस्ट या छेदमार्गावरील क्रीडा संकुल परिसरातील स्थानकाला महाराणा प्रताप सिंह व इंद्रलोक येथील स्थानकाला नवघर, भार्इंदर पश्चिमेकडील मॅक्सस मॉल परिसरातील स्थानकाला महावीर स्वामी व नेताजी सुभाषचंद्र मैदान परिसरातील स्थानकाला सदानंद महाराज अशी नावे देण्याचा ठराव मांडला.
तसेच शहरात जी १८ महसूली गावे आहेत त्यांची नावेही स्थानकांना देण्याची सूचना केली. परंतु, महापौरांनी त्यांची मागणी अमान्य करत दोन्ही बाजूच्या सदस्यांना ठराव मांडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सत्ताधाºयांच्या बाजूने रोहिदास पाटील तर विरोधकांच्या बाजूने काँग्रेसचे जुबेर इनामदार यांनी ठराव मांडला.
जुबेर यांच्या ठरावाला सेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांनी अनुमोदन दिले. त्यात साईबाबा नगर परिसरातील स्थानकाला सरदार पटेल ऐवजी ब्रह्मदेव मंदिर, क्रीडा संकुल परिसरातील स्थानकाला गोडदेव, मॅक्सस मॉल येथील स्थानकाला महावीर स्वामी ऐवजी शहीद भगत सिंग या नावांचा समावेश करण्यात आला. या वेळी घेतलेल्या मतदानात अखेर पाटील यांचा ठराव बहुमताने मंजूर झाला.