ननावरे पती-पत्नी आत्महत्या प्रकरण! कारवाईसाठी गृहमंत्र्यांना भाऊ देणार शरीराच्या एकएका भागाचे 'दान' 

By सदानंद नाईक | Published: August 18, 2023 06:29 PM2023-08-18T18:29:37+5:302023-08-18T18:29:54+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-४ आशेळेगाव पाड्यात राहणाऱ्या नंदू ननावरे यांनी गेल्या आठवड्यात पत्नीसह घराच्या छतावरून आत्महत्या केली.

Nanavare husband and wife suicide case Donation of individual parts of the body to be given to the Home Minister for action |  ननावरे पती-पत्नी आत्महत्या प्रकरण! कारवाईसाठी गृहमंत्र्यांना भाऊ देणार शरीराच्या एकएका भागाचे 'दान' 

 ननावरे पती-पत्नी आत्महत्या प्रकरण! कारवाईसाठी गृहमंत्र्यांना भाऊ देणार शरीराच्या एकएका भागाचे 'दान' 

googlenewsNext

उल्हासनगर: नंदू ननावरे पतीपत्नी आत्महत्या प्रकरणी आरोपीतावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ भाऊ धनंजय ननावरे याने हाताचे बोट कापून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकाराने पोलीस अकॅशन मूड मध्ये येऊन शुक्रवारी रात्री पर्यंत अटक कारवाई करण्याची प्रतिक्रिया खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ आशेळेगाव पाड्यात राहणाऱ्या नंदू ननावरे यांनी गेल्या आठवड्यात पत्नीसह घराच्या छतावरून आत्महत्या केली. आत्महत्यांपूर्वी पतीपत्नीने एक व्हिडिओ बनवून वरिष्ठ पोलीस अधिकारी, जवळचे नातेवाईक व राजकीय नेत्यांना पाठविला होता. व्हिडीओ मध्ये पतीपत्नीने सातारा फलटण येथील संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर व वकील असणाऱ्या दोन देशमुख बंधूंचा उल्लेख केला. निकाळजे याने अंबरनाथ मध्ये येऊन, अनेक नेत्यांच्या भेटा घेतल्याचे व्हिडिओत म्हटले आहे. गेल्या आठवड्यात मृत नंदू ननावरे यांचा भाऊ धनंजय ननावरे यांच्यासह इतर नातेवाईकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून, ननावरे पतीपत्नी आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

 दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथक ठाणे यांच्याकडे वर्ग झाला. मात्र तपासात प्रगती होत नसल्याच्या निषेधार्थ भाऊ धनंजय ननावरे याने सुरीने हाताचे बोट कापून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविणार असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकाराने एकच खळबळ उडाली. तसेच प्रत्येक आठवड्याला शरीराचा एकएक भाग कापून पाठविणार असल्याचा इशाराही दिला आहे. याप्रकारने खंडणी विरोधी पथक अकॅशन मूड मध्ये येऊन पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी गुरवारी संध्याकाळ पर्यंत अटकेची कारवाई करतो. अशी प्रतिक्रिया दिली. मृत नंदू ननावरे हे माजी आमदार पप्पु कलानी व ज्योती कलानी यांचे खाजगी स्वीयसहायक राहिले असून कलानी व आमदार किणीकर यांचे मंत्रालयातील कामे करीत असल्याचे बोलले जाते. त्यांचे अनेक आमदार सोबत जवळचे संबंध राहिल्याने आहेत. 

मोठे मासे फसण्याची शक्यता
 ननावरे पतीपत्नीने आत्महत्यांचे टोकाचे पाऊल का उचलले? याचा शोध लावण्याचे काम खंडणी विरोधी पथकावर आहे. तपास स्वच्छ व सखोल झाल्यास मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे. तसेच संथ तपासाबाबत संशयही व्यक्त होत आहे.

Web Title: Nanavare husband and wife suicide case Donation of individual parts of the body to be given to the Home Minister for action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.