कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरीकांचा शोध घेण्यात पालिकेची अनास्था, नारायण पवार यांचे आयुक्तांनी पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 03:46 PM2020-04-16T15:46:00+5:302020-04-16T15:47:29+5:30
कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात नाही, त्यांचा शोध घेतला जात नसल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे जेष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त विजय सिघंल यांना पत्र देऊन याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी केली आहे.
ठाणे : कोरोनाच्या पॉझीटीव्ह रु ग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींबाबत माहिती घेण्याबरोबरच त्यांचा शोध घेऊन क्वारंटाईन करण्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अनास्था दाखिवली जात असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. ठाणे शहरातील दोन ठिकाणी घडलेल्या घटनांची माहिती देत त्यांनी आयुक्त विजय सिंघल यांना पत्र पाठवून तातडीने हालचाली करण्याची मागणी केली आहे.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील एका इमारतीत बुधवारी रु ग्ण आढळला होता. मात्र, त्यानंतरही त्याची राहती इमारत सील केलेली नाही. त्याची मुले खुलेआमपणे रस्त्यावर फिरत होती. संबंधित रु ग्णाच्या पत्नीचे १२ ते १५ दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, अंत्यसंस्कारासाठी आलेले नातेवाईक व मित्र परिवार, उत्तरकार्यासाठी आलेला पुरोहित यांची माहिती महापालिकेने घेतली नाही. या काळातच संबंधित रु ग्णाला चक्कर आल्यानंतर रु ग्णालयात नेण्यात आले होते. त्याला रु ग्णालयात नेणारे नागरिक व रु ग्णालयाची माहितीही प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. दुसºया एका घटनेत, कोरोना पॉझीटीव्ह आढळलेल्या एका व्यक्तीची शहरातच लॉंड्री आहे. त्याठिकाणी त्याची सातत्याने ये-जा सुरू होती. त्याच्या परिचयातील काही पॉझीटीव्ह झालेल्या रु ग्णांचे गणवेशही लॉंड्रीत धुण्यासाठी आणले जात होते. मात्र, या लॉंड्रीतील कर्मचारी व आजूबाजूच्या दुकानदारांची माहिती अद्यापी प्रशासनाने घेतली नाही. अशा परिस्थितीमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर रु ग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
ठाणे शहरात सध्या खाजगी लॅबच्या माध्यमातून संशियत रु ग्णांची तपासणी सुरू आहे. मात्र, त्यासाठी ४५०० रु पये मोजावे लागत आहेत. ते सामान्य नागरिकांना परवडणारे नाही. तरी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने कोरोनाच्या संशियत रु ग्णांची तपासणी सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
जंतूनाशकांच्या तपासणीची मागणी
गेल्या महिनाभरात ठाणे शहरातील विविध भागांत जंतूनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. मात्र, कोरोना आटोक्यात आलेला नाही. उलट १०० हून अधिक रु ग्णसंख्या झाली. त्यामुळे संबंधित जंतूनाशक औषधे परिणामकारक आहेत का, त्याचा उपयोग झाला आहे का, याबाबत चौकशी करावी, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.